पुण्यात अभिनव देशमुख, तानाजी सावंत यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 03:34 PM2020-09-22T15:34:16+5:302020-09-22T15:40:59+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध धंदे मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सन्मान खाकी वर्दीचा कार्यक्रमांर्तगत सन्मानित केले. तसेच किणी टोल नाक्यावर  बिष्णोई टोळीवर धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सत्कार केला.

Abhinav Deshmukh, Tanaji Sawant felicitated in Pune | पुण्यात अभिनव देशमुख, तानाजी सावंत यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पुणे येथे झालेल्या सन्मान खाकी वर्दीचा या कार्यक्रमात कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात अभिनव देशमुख, तानाजी सावंत यांचा सत्कारसन्मान खाकी वर्दीचा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कार्यक्रम

कोल्हापूर : जिल्ह्यात अवैध धंदे मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सन्मान खाकी वर्दीचा कार्यक्रमांर्तगत सन्मानित केले. तसेच किणी टोल नाक्यावर  बिष्णोई टोळीवर धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सत्कार केला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलीस दलात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुणे येथे सोमवारी सन्मान केला. कोल्हापुरात अवैध व्यवसायाला हद्दपार करणारे तसेच मोकांतर्गत गुन्हेगारांचा बीमोड करणारे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार केला.

याशिवाय राजस्थानमधील ००७ बिष्णोई टोळीतील लिडर श्यामलाल पुनिया याच्यासह तिघांच्यावर धााडसाने गोळीबार करून त्यांच्या मुसक्या आवळणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव केला.
 

Web Title: Abhinav Deshmukh, Tanaji Sawant felicitated in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.