शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी ९ हजार ईव्हीएम मशीन, सर्व तालुक्यांना वाटप पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:43 IST

जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल तसे हालचालीनाही वेग येणार

कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ९ हजार ३५० बॅलेट युनिट व ४ हजार ६७० कंट्रोल युनिटचे वाटप सोमवारी तालुक्यांना झाले. रमणमळा येथील गोदामातून सर्व तालुक्यांना हे मशीन पाठविण्यात आले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान व ७ फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्याअंतर्गत सोमवारी तालुक्यांना बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात आले.

वाचा: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर

निवडणुकीच्या प्रशासकीय कामाचे संनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयातून केले जात असून उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी हे याचे समन्वय करत आहेत. जसजसे मतदानाचा दिवस जवळ येईल तसे हालचालीनाही वेग येणार आहे.

राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची तपासणी

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी वेळेत पूर्ण करणे, स्ट्राँग रूम उघडणे व बंद करणे, त्यांची वाहतूक यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडली जाईल. कुठेही मतदान प्रक्रिया खंडित न होण्यासाठी मॉक पोल व आवश्यक तपासण्या केल्या जातील. राजकीय पक्षांनीदेखील आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवडणूक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, उमेदवारांसाठी सुलभ परवाने उपलब्ध होण्यासाठी १२ ठिकाणी एक खिडकी योजना सुरू असेल. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा असतील. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २३ व २४ जानेवारी रोजी तर दुसरे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी होईल. उपजिल्हाधिकारी डॉ. खिलारी यांनी आचारसंहिता, परवान्यांच्या प्रक्रिया, प्रचार कालावधी याची माहिती दिली.

तालुका : कंट्रोल युनिट : बॅलेट युनिट

  • करवीर : ७३० : १४६०
  • शाहुवाडी : ३७० : ७४०
  • हातकणंगले : ६३० : १२६०
  • गगनबावडा : ९० : १८०
  • राधानगरी : ३९० : ७८०
  • आजरा : २२० : ४४०
  • पन्हाळा : ३८० : ८९०
  • कागल : ४१० : ६७०
  • शिरोळ : ४१० : ८२०
  • भुदरगड : ३२० : ६४०
  • गडहिंग्लज : ३५० : ७३०
  • चंदगड : ३७० : ७४०
  • एकूण : ४ हजार ६७० : ९ हजार ३५०
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: EVMs Distributed to Talukas for Council Polls

Web Summary : 9,350 ballot units and 4,670 control units were distributed to Kolhapur's talukas for the upcoming Zilla Parishad and Panchayat Samiti elections on February 5th. The vote counting will be held on February 7th. The district administration is overseeing preparations.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५EVM Machineईव्हीएम मशीन