कोल्हापूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-४८ (NH-४८) वर ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. यासाठी ३५७.९९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
३-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-४८ वर दोन्ही बाजूस ३-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी ३५७.९९ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-४८ हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो.
जलद अन् सुरळीत वाहतूक
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ५-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपातकालीन सेवांवर देखील होत आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतीमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपातकालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.
Web Summary : Kagal, Kolhapur will get a 6-lane elevated corridor with service roads. Nitin Gadkari approved the ₹357.99 crore project to ease traffic, boost industry, and ensure faster transport. The project will improve connectivity and efficiency.
Web Summary : कोल्हापुर के कागल में सर्विस रोड के साथ 6-लेन एलिवेटेड कॉरिडोर बनेगा। नितिन गडकरी ने ₹357.99 करोड़ की परियोजना को मंजूरी दी, जिससे यातायात सुगम होगा, उद्योग को बढ़ावा मिलेगा और परिवहन तेज होगा। परियोजना कनेक्टिविटी और दक्षता में सुधार करेगी।