शहरात ३५६ व्यक्तींना कोराेना प्रतिबंधात्मक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:50+5:302021-01-21T04:22:50+5:30
कोल्हापूर : शहरातील पाच आरोग्य केंद्रांवर बुधवारी महापालिकेतर्फे ३५४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. गेल्या तीन दिवसांतील ही ...

शहरात ३५६ व्यक्तींना कोराेना प्रतिबंधात्मक लस
कोल्हापूर : शहरातील पाच आरोग्य केंद्रांवर बुधवारी महापालिकेतर्फे ३५४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. गेल्या तीन दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न घाबरता पुढे येऊन ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी केले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोल्हापूर शहर हद्दीतील ११ हजारांहून अधिक आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचली जाणार असून, रविवारपासून त्याची सुरुवात झाली. रविवारी पहिल्या दिवशी १८३, तर मंगळवारी दुसऱ्या दिवशी २२५ जणांना लस टोचली गेली. बुधवारी सर्वाधिक ३५४ जणांना लस टोचली गेली. शहरातील पाच नागरी आरोग्य केंद्रांवर हे काम सुरू असून, प्रत्येक केंद्रावर प्रत्येक दिवशी साधारण शंभर जणांना लस टोचली जाणार आहे.