शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बॅँकेच्या २३ माजी संचालकांचे अर्ज अवैध

By admin | Updated: April 10, 2015 01:09 IST

चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केलेल्या २३ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविल्याने दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी गुरुवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केलेल्या २३ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविल्याने दिग्गज नेत्यांना धक्का बसला आहे. यामध्ये आ. अनिल बाबर, माजी मंत्री मदन पाटील, अजितराव घोरपडे, मोहनराव कदम, विलासराव शिंदे यांचा समावेश आहे. दाखल झालेल्या ४८२ अर्जांपैकी ४५५ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत बुधवारी एकूण ४८२ अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी अर्जांची छाननी करताना चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केलेल्या २३ माजी संचालकांचे अर्ज बाजूला काढण्यात आले. त्यानंतर अन्य अर्जांची (पान ६ वर)२३ माजी संचालकांचे अर्ज अवैध(पान १ वरून) छाननी प्रथम करण्यात आली. यात ४ अर्ज बाद ठरले. सहकार विभागाने केलेल्या लेखापरीक्षणात ४ कोटी १८ लाखांचा गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असली, तरी आॅडिट फी (चौकशी) शुल्काची जबाबदारी तत्कालीन ४० माजी संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे. सहकार विभागाने हा निर्णय गत आठवड्यात घेतला होता. या निर्णयामुळे माजी संचालकांना जिल्हा बॅँकेची निवडणूक लढविणे मुश्कील झाले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार गैरव्यवहाराची रक्कम निश्चित झाली आणि ती भरली तरी निवडणुकीस अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे यातील १७ माजी संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणीची तारीख होती. त्यामुळे ११ वाजता होणारी छाननी ३ वाजेपर्यंत स्थगित केली होती, मात्र सुनावणी एक दिवस लांबणीवर गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रीतसर छाननी प्रक्रिया पार पाडली. दाखल झालेल्या अर्जांमधून २३ माजी संचालकांचे अर्ज बाजूला काढण्यात आले होते. या २३ माजी संचालकांच्या अर्जांवर रात्री ११ वाजता निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयात आज सुनावणीसहकार विभागाच्या कारवाईविरोधात १७ माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच माजी संचालकांचे अपील गुरुवारी फेटाळून लावले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.