शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तालुक्यात १२ युवकांची फसवणूक

By admin | Updated: October 9, 2015 00:40 IST

रेल्वेत नोकरीचे आमिष : ३७ लाखांचा गंडा

चंदगड : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चंदगड तालुक्यातील १२ युवकांना धमेंद्र रवींद्र शिरोडकर (डिचोली, गोवा), गोपाळ रावजी केवदे (रा. कोहोळी, ता. कल्मेश्वर, जि. नागपूर) या संशयितांनी ३७ लाखांचा गंडा घातला. याबाबत चंदगड पोलिसांत त्यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. डोझर व जेसीबी भाड्याने देणाऱ्या दशरथ रुक्माणा गाडे यांनी डिचोली, गोवा येथील धमेंद्र शिरोडकर यांना जेसीबी भाड्याने दिला होता. त्यांनी मुलगा व पुतण्या नोकरी शोधत असल्याचे शिरोडकरना सांगितले. तेव्हा नागपूरला रेल्वेत ओळखीचे अधिकारी असल्याचे सांगून शिरोडकर यांची नागपूरचे गोपाळ केवदे याच्याशी कलगुंट बीच (गोवा) येथील लॉजवर भेट घडवून आणली. यावेळी केवदेने आपण रेल्वेत अधिकारी असून मुलाला लिपिक म्हणून लावतो, असे सांगून शिरोडकर व केवदे यांनी चंदगडला येऊन गाडे यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. यावेळी केवदे यांनी आणखी गरजू मुले असतील तर त्यांनाही भेटवा, नोकरी लावतो, असे सांगितले होते. आठ-दहा दिवसांनी गाडे गजानन तुपारे (ढोलरवाडी), प्रशांत पोवार (खडकेवाडा, कागल) व धमेंद्र शिरोडकर यांच्यासह नागपूरला गेले. यावेळी तुपारे व पोवार यांनी पाच लाख ६० हजार केवदेला दिले. त्यानंतर केवदेने चंद्रकांत गाडे, दिगंबर गाडे, महेश पाटील व इतरांना बिलासपूर (छत्तीसगड) येथील हॉटेलवर कर्मचाऱ्यांप्रमाणे गणवेश व कमरपट्टा देऊन ठेवले, पण बरेच दिवस कॉललेटर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास उपनिरीक्षक गंफले करीत आहेत. (प्रतिनिधी)फसवणूक झालेल्या युवकांची नावे व रक्कम कंसात - अनिल गुरव - सातवणे (एक लाख दहा हजार), श्रीपाद जोशी - हेरे (दोन लाख पाच हजार), महेश पाटील - इनाम सावर्डे (चार लाख ५२ हजार), दीपक साबळे - सत्तेवाडी (चार लाख २० हजार), प्रवीण पाटील - सरोळी (चार लाख सात हजार), निवृत्ती खातकर - सत्तेवाडी (चार लाख २० हजार), गजानन तुपारे (तीन लाख ३० हजार), प्रशांत पोवार - खडकेवाडा (तीन लाख ७५ हजार), चंद्रकांत गाडे - सातवणे (दोन लाख ५९ हजार), दिगंबर गाडे - सातवणे (८० हजार), दशरथ गाडे - सातवणे (दोन लाख ५० हजार), प्रमोद गुरव - करंजगाव (चार लाख ५६ हजार).