शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून कमी पाऊस पडूनही कल्याण डोंबिवली गेली पाण्याखाली; समोर आलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:28 IST

शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यानं अफवांचं पीक

- मयुरी चव्हाण 

कल्याणकल्याणडोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुसंख्य परिसरात पावसाचे पाणी शिरून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गुरुवारी कल्याण डोंबिवली परिसराचे जनजीवन विस्कळीत झालेलेपाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचत असल्याने अफवांचे पीकदेखील आले होते. मात्र भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि हे पाणी शहरात शिरल्याचे दिसून आले आणि गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेऊनही भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि त्यासोबत आलेली भरती यामुळे कल्याण डोंबिवली शहर पाण्याखाली गेले.

गुरुवारी सकाळपासून कल्याण पूर्व परिसर, डोंबिवलीतील देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, एमआयडीसी, टिटवाळा, शहाड, ठाकुर्ली या परिसरात पाणी साचले होते. चाळी व गृहसंकुल पाण्याखाली गेली होती. गुरुवारी मुसळधार पाऊस झाला नाही तरीही पाणी का साचतय असा सवाल निर्माण झाला होता. यातच गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेले असल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती गंभीर होणार अशी अफवा सर्वत्र पसरली होती. जो तो प्रत्येकाला ही माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करत होता. अखेर ही अफवा असून बारवी धरण अद्याप पूर्ण भरले नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गुरुवारी पावणे एक ते तीन ही वेळ भरतीची होती. कल्याण डोंबिवली शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे वालधुनी , उल्हास नदी ,काळू नदी देखील शहाराला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच नदी, खाडीकिना-यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यात गुरुवारी भरती असल्याने सुमारे 4. 7 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे पाणी हळूहळू शहरात शिरले अन जनजीवन विस्कळित झाले.

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली