लोकमत न्युज नेटवर्क उल्हासनगर: महापालिका सत्तेत महायुती असताना भाजपाला निर्णय प्रक्रियातुन वारंवार डावलले जात असल्याचा आरोप भाजपा गटनेता राजेश वधारिया यांनी करून त्यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेतुन सभात्याग केला. तर महापौर अश्विनी निकम व शिंदेसेनेच्या नगरसेवकानी भाजप विना महासभा सुरू ठेवली आहे. याप्रकाराने भाजप व शिंदेसेनेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर महापालिका महासभा सुरू होताच भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी शिंदेसेने विरुद्ध सुर लावत शिंदेसेना नेते भाजपाला निर्णय प्रक्रियेतून वगळत असल्याचा आरोप केला. महापालिकेच्या महिल्या महासभेत लाडकी विध्यार्थिनी शिष्यवृती योजनेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचे सर्वानुमते ठरले असताना ऐनं वेळेवर माजी आमदार ज्योती कलानी यांच्या नावाचा प्रस्ताव आणला. तर दुसऱ्या महासभेत काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांना विरोधी पक्षनेते पदी भाजपाच्या विचारविनिमय शिवाय घोषित केले. तर शुक्रवारी होणाऱ्या महासभेचा अजेंडा भाजप नेत्याना विश्वासात न घेता काढला. असा आरोप वधारिया यांनी केला. सत्तेत एकत्र असताना भाजपा निर्णय प्रक्रियेतून डावलले जात असल्याने भाजपा नगरसेवक महासभात्याग करीत आहेत. असे वधारिया बोलून त्यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
भाजपाच्या नगरसेवकांच्या सभात्यागानंतर शिंदेसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी महासभा सुरू होण्यापूर्वी भाजप व शिंदेसेनेच्या समन्वय कमिटी सदस्यात चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच महासभा अजेंडा काढला त्यावेळी भाजपाला विश्वासात घेतले नाही. याबाबत पक्ष नेटनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. असे असतानाही, भाजपाने सभात्याग करनेने चुकीचे आहे. भाजपा प्रत्येक वेळी शिंदेसेनेला कोंडीत पकडत असून एक प्रकारे शहर विकासाचे नुकसान करीत आहे. असा आरोप शिंदेसेना नगरसेवकांनी केला. भाजप व शिंदेसेनेच्या या वादाने पुन्हा दोन्ही पक्षातील मतभेत चव्हाट्यावर आला आहे. भाजपाच्या सभात्याग मध्ये उपमहापौर अमर लुंड यांनीही पक्षाच्या नगरसेवका सोबत सभात्याग केल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले.
भाजप नगरसेवका विना महासभा
शिंदेसेना नेते निर्णय प्रक्रियेतून डावलत असल्याचा आरोप करून भाजपाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यानंतरही महापौर अश्विनी निकम व शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी महासभा सुरू ठेवली. अनेक विषयाला महासभेत मंजुरी दिली आहे.
Web Summary : BJP corporators boycotted Ulhasnagar Municipal Corporation meeting, alleging Shinde Sena sidelined them in decision-making. This reignited tensions between the parties, with accusations of hindering city development.
Web Summary : भाजपा पार्षदों ने उल्हासनगर महानगरपालिका की बैठक का बहिष्कार किया, आरोप लगाया कि शिंदे सेना ने उन्हें निर्णय लेने में अलग कर दिया। इससे पार्टियों के बीच तनाव फिर से बढ़ गया, शहर के विकास में बाधा डालने के आरोप लगे।