शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला

By मुरलीधर भवार | Updated: June 10, 2025 06:02 IST

विकी मुख्यदल हे ठाण्यातील रेल्वे पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कामाला होते. त्यांची रविवारी रात्रपाळी होती. रात्रपाळीचे काम संपवून ठाण्याहून गाडी पकडून घरी येण्यासाठी ते निघाले.

मुरलीधर भवार

कल्याण : विकी मुख्यदल हे ठाण्यातील रेल्वे पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कामाला होते. त्यांची रविवारी रात्रपाळी होती. रात्रपाळीचे काम संपवून ठाण्याहून गाडी पकडून घरी येण्यासाठी ते निघाले. त्यांनी पत्नी हर्षा हिला फोन करून “मी घरी यायला निघालो,” असे सांगितले. मात्र, ते घरी पोहोचू शकले नाहीत. त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मुंब्रा रेल्वे स्थानकात चालत्या गाडीतून पडून झालेल्या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला.

विकी हे कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील सह्याद्री इमारतीच्या ‘डी’ विंगमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी त्यांच्या पत्नीला कळविताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी कळताच काही तासांत पोलिस व्हॅन कल्याणच्या लोकग्राम परिसरातील मुख्यदल यांच्या घरी पोहोचली.

मुख्यदल यांचे बुलढाणा जिल्ह्यातील जुमडा (ता. देऊळगाव राजा) हे मूळ गाव. गावी त्यांचे आई, वडील आणि भाऊ आहेत. पार्थिवावर गावी अंत्यसंस्कार होणार असल्याने पोलिस त्यांची पत्नी आणि मुलगा प्रणय याला घेऊन गावी निघाले आहेत.

३ वर्षाच्या मुलाचे बाबा गेले

प्रणय हा अवघा तीन वर्षांचा आहे. प्रणयचा येत्या १७ जून रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुख्यदल आणि त्यांची पत्नी हे उत्साहित होते. ७ जूनला मुख्यदल यांचा वाढदिवस झाला. त्यांनी व्हॉट्सॲपवर सेलिब्रेशनचा डीपी ठेवला होता, हे सांगताना त्यांच्या शेजारी स्नेहा कावळे यांना रडू कोसळले. आम्ही एक चांगला शेजारी गमावला आहे, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघात