रडत-रडत तरुणीनं गाठलं पोलीस ठाणं; आपबिती ऐकून पोलीसही हादरले, म्हणाली, "चार वर्षांपासून माझा बाप..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:17 IST2026-05-09T12:10:33+5:302026-05-09T12:17:12+5:30

Kalyan Man Rapes Daughters: कल्याणमध्ये नराधम बापाने पोटच्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.

Shocking, Father raped his two daughters In Kalyan West Malang Road | रडत-रडत तरुणीनं गाठलं पोलीस ठाणं; आपबिती ऐकून पोलीसही हादरले, म्हणाली, "चार वर्षांपासून माझा बाप..."

रडत-रडत तरुणीनं गाठलं पोलीस ठाणं; आपबिती ऐकून पोलीसही हादरले, म्हणाली, "चार वर्षांपासून माझा बाप..."

पुण्यातील घटना ताजी असताना कल्याण येथील एका नराधम बापाने पोटच्या दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगरोड परिसरात हा विकृत बाप, त्याची पत्नी आणि दोन मुलींसह राहतो. तो ४३ वर्षांचा आहे. तर, पीडित तरुणी १९ वर्षांची आहे. हा नराधम काहीही काम करीत नाही. गेल्या चार वर्षापासून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. लहान बहिणीवरही त्याने अत्याचार केल्याचे पीडितेने गुरुवारा तक्रारीत म्हटले आहे. 

अत्याचार असह्य झाल्याने तिने मानपाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीला अटक केली. त्याला शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सादळकर करीत आहेत. या नराधम बापाच्या कृत्याबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Web Title : चार साल से बेटियों का यौन शोषण करने वाला पिता गिरफ्तार।

Web Summary : कल्याण में एक पिता को अपनी दो बेटियों का पिछले चार सालों से यौन शोषण करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। 19 वर्षीय पीड़िता ने पुलिस को दुर्व्यवहार की सूचना दी, जिसके बाद पिता को गिरफ्तार कर अदालत में पेश किया गया। वह अब पुलिस हिरासत में है।

Web Title : Father arrested for sexually abusing daughters for four years.

Web Summary : A father in Kalyan has been arrested for sexually abusing his two daughters for the past four years. The 19-year-old victim reported the abuse to the police, leading to the father's arrest and court appearance. He is now in police custody.