उल्हासनगरात अमानुष प्रकार; महिलेला अर्धनग्न करून मारहाण करीत कापले डोक्याचे केस
By सदानंद नाईक | Updated: May 15, 2026 20:35 IST2026-05-15T20:34:24+5:302026-05-15T20:35:29+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ६ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरात अमानुष प्रकार; महिलेला अर्धनग्न करून मारहाण करीत कापले डोक्याचे केस
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, झेरी मेरी माता मित्रमंडळ, महाराजा चिक्की कंपनी शेजारी, विठ्ठलवाडी येथे राहणाऱ्या कांता राजपूत ह्या मुलगी व बहीण यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जात होत्या. याचा राग येऊन त्याना अर्धनग्न करून आमनुष मारहाण व डोक्याचे केस कापल्याची आमनुष घटना गुरुवारी सकाळी घडल्याचे उघड झाले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ६ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, झरी मरी माता मित्र मंडळ या परिसरात कांता प्रेम राजपूत ह्या कुटुंबासह राहतात. त्यांचे शेजारील वाघरी कुटुंबा सोबत गुरुवारी सोबत तू तू मै मै झाली. याची तक्रार देण्यासाठी कांता राजपूत ह्या बहीण गीता व मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाणेत तक्रार देण्यासाठी सकाळी १० वाजता जात होत्या. यांचा राग येऊन ज्यूली वाघरी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कांता राजपूत यांच्यासह बहीण गीता व मुलगी अंजली राजपूत यांना नितीन थोरात यांच्यासह अन्य जणांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.
ज्युली वाघरी व विणु वाघरी यांनी चक्क कांता राजपूत यांचे डोक्याचे केस कापून विद्रुप केले. बहीण गीता व मुलगी अंजली यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण गंभीर जखमी केले. या आमनुष प्रकारानंतर राजपूत यांनी पोलीसात तक्रार दिल्यास तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देवुन शिवीगाळ केली.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कांता राजपूत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्युरी वाघरी, विणु वाघरी, पप्पू वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बाळू वाघरी, महेश वाघरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या मारहाणीचा व महिलांचे केश कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आरोपीवर कडक कारवाईची मागणी सर्वस्तरावरून होत आहे