शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिमेत उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याने उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या; जाब विचारताच अधिकारी गेला पळून

By मुरलीधर भवार | Updated: November 16, 2024 17:58 IST

बॅनर फाडणाऱ्यांच्या विराेधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता  पळ काढला.

कल्याण : विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आत्ता अंतिम टप्प्यात शिगेला पोहचली आहे. कल्याण पश्चिम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकारी अधिक जाणून बुजून त्यांच्याच बॅनर काढताय असा गंभीर आरोप करीत   मुथा यांनी रस्त्यावर याच्या निषेधार्थ  मुथा यांनी दोन तास ठिय्या दिला. या प्रकरणाचा जाब त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी काही एक जबाब न देता त्याने पळ काढला. 

कल्याण पश्चिम मतदार संघातून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार मुथा यांनी त्याच्या प्रचारार्थ मतदार संघात बॅनर लावले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून त्यांचे बॅनर त्यांच्या विरोधकांकडून फाडले जात आहे. या प्रकरणी मुथा यांनी तक्रार केली आहे. दुसरीकडे त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढला जात आहे. केडीएमसी प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आले. ही घटना कळताच मुथा यांनी माेहने परिसरात धाव घेतली. त्यांनी त्याठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन केले.

बॅनर फाडणाऱ्यांच्या विराेधात कारवाईची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहे त्याच्या जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता  पळ काढला. या विषयी मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुथा यांनी सांगितले की, बॅनर फाडून कोणालाही निवडणूका जिंकता येत नाहीत. बॅनर फाडण्याचे काम इर्षेपोटी केले जात आहे. विराेधकांना पराभव दिसून लागल्याने त्यांच्याकडून हे कृ्त्य केले जात आहे एकीकडे बॅनर फाडले जात आहे तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावत काम करीत आहे जाणून-बुजून माझा बॅनर काढला जात आहे. २३ तारखेनंतर याठिकाणी मी पण आहे आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी आहे. तेव्हा बघू काय करायचे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुथा यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांनी विचार करुनच मतदान करावे.

टॅग्स :kalyan-west-acकल्याण पश्चिमmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४