बाप रे! केवळ फिरण्यासाठी करायचे बाईकची चोरी; कल्याणात ४ तरुणांच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गाड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:36 IST2026-05-02T18:36:22+5:302026-05-02T18:36:41+5:30
कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी केवळ फिरण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या ४ तरुणांच्या टोळीला अटक केली आहे.

बाप रे! केवळ फिरण्यासाठी करायचे बाईकची चोरी; कल्याणात ४ तरुणांच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गाड्या जप्त
कल्याण : ‘जॉय रायडिंग’साठी ते चारही तरुण मोटार सायकल चोरी करायचे. माेटार सायकलवर जॉय रायडिंग करीत असताना त्यातील पेट्रोल संपले की ती मोटार सायकल त्याच जागेवर साेडून द्यायचे. ‘जॉय रायडिंग’साठी मोटार सायकल करणाऱ््या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यकडून ७ चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपी हे परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्या केवळ फिरण्यासाठी म्हणजेच ‘जॉय रायडिंग’साठी वापरत होते. वापरानंतर या मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिल्या जात होत्या. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून चारही आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे समर्थ पाटील, हर्ष परदेशी, प्रणित शितप, रंगनाथ उर्फ सागर ढवळे अशी आहेत. यापैकी समर्थ आणि हर्ष हे कल्याणच्या बेतूरकरपाड्यात राहतात. तर प्रणित हा सापर्डे आणि रंगनाथ हा वाडेघर परिसरात राहणारा आहे. या चौघांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
आरोपींकडून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे. त्यांनी विविध भागातून चोरी केल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.