७० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी डॉ. प्रसाद साळीचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:22 IST2026-05-16T17:21:48+5:302026-05-16T17:22:15+5:30
७० लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी डॉ. प्रसाद साळी याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी डॉ. प्रसाद साळीचा जामीन अर्ज फेटाळला
कल्याण : ७० लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी डॉ. प्रसाद साळी याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळी यांनी कल्याण जिल्हा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला आहे.
खडकपाडा परिसरात राहणारे डॉ. राहूल दुबे यांनी २०२४ साली रुग्णालयात मेडिकल स्टोअर काढण्यासाठी डॉ. साळीला ७० लाख रुपये दिले होते. डॉ. साळीने मेडिकल स्टोअर न काढता दिलेली रक्कम डॉ. दुबे यांना परत करता परस्पर वैयक्तिक कामासाठी वापरली. मेडिकल स्टोअरचे काम न झाल्याने डॉ. दुबे यांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केली. त्याच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलीस ठाणे गाठले.
खडकपाडा पोलिसांनी डॉ. साळीच्या विरोधात ७० लाख रुपये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉ. साळी यांना पोलिसांनी २३ मार्चला अटक केली. अटकेनंतर साळीला ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडी संपुष्टात आल्यावर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी केली. दरम्यान साली खालच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज न्यायालने फेटाळल्यावर पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला हाेता.
अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. या फसवणूक प्रकरणी साळीची पत्नी वैशाली या देखील सह आरोपी आहेत. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. वैशाली यांनी अटकपूर्व जामीनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला असल्याची माहिती फिर्यादीचे वकील हरीष नायर यांनी दिली आहे.