Maharashtra State Kabaddi Association: Gajanan Kirtikar elected as the Executive President | महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन : गजानन कीर्तिकर यांची कार्याध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन : गजानन कीर्तिकर यांची कार्याध्यक्षपदी निवड

मुंबई :  गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात सामना रंगला होता. तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.
    या मतदानासाठी २५संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. कीर्तिकर ३२ मतांनी कार्याध्यक्षपदी निवडून आले. मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. पांडे हे २३मतांच्या फरकाने कोषाध्यक्षपदी निवडून असले. 
बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:-
१)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे).
२)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).
३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड).
 ४)सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).

 

Web Title: Maharashtra State Kabaddi Association: Gajanan Kirtikar elected as the Executive President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.