शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! विवाहित प्रेयसीला भेटायला तिच्या घरी आला तरूण, गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 15:58 IST

रविवारी रात्री ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी रात्री एक तरूण तुरकैजनी गावातील त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कुठी हत्या तर कुठे मारहाणीच्याही घटना घडतात. अशीच एक एका जोडप्याची विचित्र घटना समोर आली आहे. बिहारच्या वीरपूर पोलीस स्टेशन भागातील तुरकैजनी गावातील ही घटना असून येथे गावकऱ्यांनी प्रेमी जोडप्याला रात्रभर झाडाला बांधून ठेवलं आणि सकाळी दोघांचं लग्न लावून दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे महिला आधीच विवाहित आहे. 

रविवारी रात्री ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार,  रात्री एक तरूण तुरकैजनी गावातील त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. महिलेच्या घरी पती नसल्याची संधी बघताच तो तिला भेटायला आला होता. तो गावातील लोकांच्या नजरा चुकवत प्रेयसीच्या घरात शिरला. (हे पण वाचा : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या)

मात्र, त्यानंतर जे होणार होतं त्याचा त्याला अजिबात अंदाज नव्हता. गावातील काही लोकांना हे समजलं होतं की, एक तरूण महिलेला भेटण्यासाठी आला असून तिच्या घरात शिरला आहे. गावकऱ्यांनी उशीर न करता महिलेच्या घरी धाव घेतली आणि  दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर दोघांनाही रात्री वीजेच्या खांबाला बांधलं. इतकंच नाही तर सकाळ होताच गावकऱ्यांनी जबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. (हे पण वाचा : बोंबला! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा,२ चा पाढा नाही आला तर लग्नास दिला नकार!)

मीडिया रिपोर्टनुसार, हा तरूण महिलेच्या माहेरच्या गावाजवळ राहतो. तिचा पती रात्री कामासाठी बाहेर गेला होता. हे त्याला प्रेयसीने सांगितले तर तो तिला भेटायला लगेच आला. मात्र, गावातील लोकांनी त्यांना रंगेहाथ पकडून चांगलाच धडा शिकवला.

विवाहितेबाबत सांगितलं जात आहे की, महिलेला एक २ वर्षांची मुलगी आहे. तिला महिलेच्या पतीने स्वत:जवळ ठेवले आहे. महिलेने मात्र आपल्या प्रियकरासोबत न राहता पतीसोबत राहायची इच्छा व्यक्त केली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, गावकऱ्यांनी दबरदस्तीने दोघांचं लग्न लावून दिलं. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध नाहीत. गावकऱ्यांना वारंवार सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की, दोन्ही कुटुंबामध्ये प्रकरण मिटवण्यासाठी चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके