समुद्र निळा का दिसतो? आकाशाच्या निळ्या सावलीचा नाही काही संबंध, इंटरेस्टिंग आहे वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:21 IST2026-04-30T14:20:32+5:302026-04-30T14:21:25+5:30

Why Sea Blue : काहींना वाटतं की, समुद्र निळा दिसतो कारण तो आकाशाची निळी सावली रिफ्लेक्ट करतो. पण मुळात सत्य काहीतरी वेगळंच आहे.

Why is the ocean color blue, know the scientific reason behind it | समुद्र निळा का दिसतो? आकाशाच्या निळ्या सावलीचा नाही काही संबंध, इंटरेस्टिंग आहे वैज्ञानिक कारण...

समुद्र निळा का दिसतो? आकाशाच्या निळ्या सावलीचा नाही काही संबंध, इंटरेस्टिंग आहे वैज्ञानिक कारण...

Why Sea Blue : खवळणाऱ्या किंवा शांत समुद्राची ओढ अनेकांना असते. निळा, दूरदूरपर्यंत पसरलेला अथांग समुद्र मनाला एक वेगळीच शांतता देतो. म्हणूनच तर लोक समुद्र किनारी फिरायला जाण्याला अधिक प्राधान्य देतात. समुद्रातील निळं पाणी बघण्यात आणि त्यात मस्ती करण्यात एक वेगळीच मजा येते. समुद्रातील निळं पाणी सगळ्यांनाच चकीत करतं. तर अनेकांना समुद्रातील पाणी निळं कसं दिसतं? असा प्रश्न पडतो. काहींना वाटतं की, समुद्र निळा दिसतो कारण तो आकाशाची निळी सावली रिफ्लेक्ट करतो. पण मुळात सत्य काहीतरी वेगळंच आहे. यामागचं विज्ञानच अचंबित करणारं आहे. चला तर जाणून घेऊया समुद्र निळा का असतो. 

समुद्र निळा दिसण्याचं खरं कारण... 

मुळात समुद्राचा निळा रंग आहे आकाशापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामागे एक इंटरेस्टिंग वैज्ञानिक कारण आहे, जे प्रकाशाचा व्यवहार आणि पाण्याची खासियत यासंबंधी आहे. सूर्य प्रकाशाचा रंग दिसतो, तसा नसतो. त्यात सात वेगवेगळे जसे की, लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, गर्द निळा आणि जांभळा असे रंग असतात. समुद्रातील पाणी लाल, नारंगी, पिवळ्या लांब तरंगलांबीचे रंग जास्त प्रमाणात शोषून घेतं. निळ्या रंगाची तरंगलांबी कमी असल्यामुळे तो जास्त पसरतो आणि आपल्या डोळ्यांना परत दिसतो. त्यामुळे समुद्र निळा दिसतो. स्वच्छ हवेत आकाश निळं असल्यामुळे त्याचं प्रतिबिंबही पाण्यावर पडतं. पण समुद्र निळा दिसण्याचं मुख्य कारण फक्त आकाश नाही. 


कन्फ्यूज होतात लोक

समुद्रात जेवढं खोल आणि स्वच्छ पाणी पाणी असतं, तो गर्द निळा दिसू लागतो. ही प्रक्रिया आकाश निळं होण्याच्या बरीच मिळती-जुळती आहे. सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्यातील सर्व रंग असतात जसे की, जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जाताना हवेमधील लहान कण, ऑक्सिजन व नायट्रोजन रेणूंना धडकतो. निळ्या आणि जांभळ्या रंगाची तरंगलांबी कमी असल्यामुळे ते इतर रंगांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सगळ्या दिशांना विखुरतात. आपल्या डोळ्यांना निळा रंग जास्त जाणवतो, म्हणून आकाश निळं दिसतं. 

Web Title : समुद्र नीला क्यों दिखता है? विज्ञान बताता है, यह प्रतिबिंब नहीं है!

Web Summary : समुद्र का नीला रंग आकाश का प्रतिबिंब नहीं है। पानी लाल, नारंगी और पीले जैसे लंबी तरंग दैर्ध्य को अवशोषित करता है। छोटी नीली तरंग दैर्ध्य अधिक बिखरती हैं, जिससे समुद्र नीला दिखाई देता है। यह बिखरने वाला प्रभाव आकाश के नीले होने के समान है।

Web Title : Why is the sea blue? Science explains, it's not reflection!

Web Summary : The sea's blue color isn't a reflection of the sky. Water absorbs longer wavelengths like red, orange, and yellow. Shorter blue wavelengths scatter more, making the sea appear blue. This scattering effect is similar to why the sky is blue.