म्हशीचं दूध पांढरं, तर गायीचं पिवळसर का? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:59 IST2026-05-16T12:56:53+5:302026-05-16T12:59:03+5:30

Milk Interesting Facts :तुम्ही कधी विचार केला आहे का की गायीचे दूध थोडे पिवळसर दिसतं, तर म्हशीचं दूध अगदी पांढरं आणि जाडसर का असतं? हे जाणून घेऊया.

Why Is Cow Milk Slightly Yellow While Buffalo Milk Is White? | म्हशीचं दूध पांढरं, तर गायीचं पिवळसर का? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

म्हशीचं दूध पांढरं, तर गायीचं पिवळसर का? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Milk Interesting Facts : दूध रोज प्रत्येक घरात घेतलं जातं. चहा करणं असो वा दूध पिणं असो यासाठी दूध लागतंच. दुधाचा आपल्या आरोग्याशी मोठा संबंध असतो. कारण यातून शरीराला अनेक पोषक गुण मिळतात. त्यामुळे दूध घेताना अनेक लोक ते शुद्ध आहे की भेसळयुक्त, हे वेगवेगळ्या पद्धतीने तपासतात. काहीजण रंग पाहतात, काही वासावरून अंदाज लावतात, तर काहीजण दूध गरम केल्यावरच त्याची खरी गुणवत्ता ओळखतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गायीचे दूध थोडे पिवळसर दिसतं, तर म्हशीचं दूध अगदी पांढरं आणि जाडसर का असतं? हे जाणून घेऊया.

जगातील सगळ्यात मोठा उत्पादक देश

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश मानला जातो. देशात गायी आणि म्हशीच्या दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. पण या दोन्ही दुधांच्या रंगामागे वैज्ञानिक कारण दडलेले आहे. जागतिक स्तरावर दुधाच्या उत्पादनात भारताचं योगदान जवळपास २५ टक्के इतकं आहे. तर काही रिपोर्टमध्ये दावा आहे की, दूध उत्पादनाच्या बाबतीत भारतानंतर अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचा नंबर लागतो.

दुधाचा रंग वेगळा असण्याचं कारण...

एक्सपर्ट सांगतात की, गायीच्या दुधात बीटा-कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं. हा घटक नैसर्गिकरित्या पिवळसर रंगाचा असल्यामुळे गायीचं दूध हलकं पिवळं किंवा पिवळसर-पांढरं दिसतं. दुसरीकडे, म्हशीच्या शरीरात हे बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात व्हिटामिन A मध्ये बदलतं. त्यामुळे दुधात पिवळसरपणा कमी राहतो आणि म्हशीचे दूध अधिक पांढरे व क्रीमयुक्त दिसतं. याशिवाय, म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे ते अधिक घट्ट आणि मलाईदार वाटतं. गायीचं दूध तुलनेनं हलकं आणि पचायला सोपं मानलं जातं.

हेच सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर गायीच्या दुधात कॅरेटिन नावाचं प्रोटीन असतं, ज्यामुळे त्याचा रंग हलका पिवळा असतो. तर म्हशीच्या दुधात कॅसीन नावाचं प्रोटीन असतं, ज्यामुळे त्याचा रंग पांढरा असतो.

A1 आणि A2 दुधात काय फरक?

A1 दूध काय आहे?

A1 दूध सामान्यपणे परदेशी प्रजातीच्या गायी जसे की, होल्स्टीन आणि जर्सीमधून मिळतं. काही संशोधनातून समोर आलंय की, A1 प्रोटीन पचनादरम्यान BCM - 7 नावाचा एक पदार्थ तयार होऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना पोट फुगणे, गॅस किंवा पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. पण सध्या यावर वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. 

A2 दूध काय आहे?

A2 दूध हे भारतातील देशी प्रजातीच्या गायी जसे की, गिर, साहीवाल आणि सिंधी गायींपासून मिळतं. हे दूध पचनासाठी हलकं मानलं जातं. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की, A2 दूध पोटासाठी हलकं आहे. याने गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जडपणा अशा गोष्टींचा त्रास दूर करण्यास मदत मिळते. 

Web Title : गाय का दूध पीला, भैंस का सफेद: जानिए चौंकाने वाला कारण!

Web Summary : गाय के दूध में बीटा-कैरोटीन से पीलापन, भैंस के दूध में विटामिन ए में बदलने से सफेदी आती है। भारत दूध उत्पादन में विश्व में अग्रणी है।

Web Title : Cow milk yellowish, buffalo milk white: Know the surprising reason!

Web Summary : Cow milk is yellowish due to beta-carotene, while buffalo milk converts it to vitamin A, making it whiter and richer in fat. India leads in milk production globally.