रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:32 IST2026-04-17T15:31:21+5:302026-04-17T15:32:32+5:30
Train Stripes Meaning : रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे.

रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ
Train Stripes Meaning : आपण जर नियमितपणे रेल्वेने प्रवास करत असाल तर पाहिलं असेल की, काही रेल्वेमध्ये वेगवेगळ्या रंगांचे डबे असतात. या वेगळ्या रंगाच्या डब्यांनाही अर्थ असतो. त्यासोबतच काही डब्यांवर आपण निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, हिरव्या आणि लाल रंगांच्या लाईन्सही पाहिल्या असतील. रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे.
निळ्या किंवा लाल डब्यांवर असलेल्या या पिवळ्या लाईन्स अशा डब्यांवर असतात, जे डबे दिव्यांग प्रवासी किंवा ज्यांना मेडिकल मदतीची गरज असते त्यांच्यासाठी आरक्षित असतात. या डब्यांमध्ये बसण्याची खास व्यवस्था आणि सुलभ शौचालय असतं.
निळ्या डब्यांच्या शेवटच्या खिडकीवर असलेली एक पांढरी लाईन दर्शवते की, हा डबा जनरल आहे. हलक्या निळ्या किंवा मग भुरक्या डब्यांवर असलेल्या हिरव्या लाईन्स दर्शवतात की, हा डबा खासकरून महिलांसाठी आरक्षित आहे. गर्दीत हा व्हिज्युअल संकेत खूप मदतीचा ठरतो.
भुरक्या रंगाच्या डब्यावरील लाल लाईन्स दर्शवतात की, हा डबा फर्स्ट क्लासचा आहे. असा लाईन्स सामान्यपणे मुंबई लोकल नेटवर्कमध्ये बघायला मिळतात. निळ्या डब्यांना इंटीग्रल कोच फॅक्टरी डबा म्हटलं जातं. हे पारंपारिक डबे आहेत, ज्यांचा वापर पूर्ण भारतीय रेल्वेमध्ये केला जातो आणि हे सामान्यपणे मध्यम गतीने धावतात.
लाल रंगाचे डबे लिंके हॉफमॅन बुश श्रेणीचे असतात. हे फार अॅडव्हान्स आणि सुरक्षित असतात. यांचा वापर जास्तकरून राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमिअम रेल्वेंमध्ये केला जातो.