शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

उतावळ्या नवरदेवाने स्टेजवर नवरीला केलं KISS, पाहुण्यांसोबत त्याचीही केली गेली 'धुलाई'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:38 IST

नवरदेवाने लग्नात असं काही केलं की, लाठी काठ्यांनी त्याला आणि त्याच्या पाहुण्यांना मार बसला.

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात सोशल मीडियावर लग्नातील अनेक अतरंगी व्हिडीओ किंवा घटना व्हायरल होत असतात. कधी नवरी लग्नाच्या वेळेवर पळून जाते तर कधी नवरदेव गुटखा खातो म्हणून लग्न मोडते. तर कधी नवरदेव एखाद्या कारणाने लग्न मोडतो. अनेकदा लग्नातील भांडणांच्याही घटना समोर येतात. अशीच एक घटना यूपीच्या हापूडमधून समोर आली. इथे नवरदेवाने लग्नात असं काही केलं की, लाठी काठ्यांनी त्याला आणि त्याच्या पाहुण्यांना मार बसला.

नवरीकडील लोकांनी केवळ नवरदेवच नाही तर त्याच्या पाहुण्यांचीही चांगली धुलाई केली. नंतर नवरदेवाकडील लोकांनीही दगडफेक केली. अशात लग्न मंडपी एकच गोंधळ उडाला. बरेच लोक जखमी झाले. आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, येथील अशोकनगरमध्ये लग्न सुरू होतं. हार टाकण्याच्या रिवाजावेळ नवरदेवाने स्टेजवरच सगळ्यांसमोर नवरीला किस केलं. नवरदेवाच्या या वागण्यावर नवरीकडील लोक भडकले आणि त्यांनी नवरदेवासोबतच त्याच्या पाहुण्यांनाही मारहाण सुरू केली.

काही वेळातच दोन्हीकडील पाहुणे एकमेकांना मारू लागले. लाठ्याकाठ्या जे हाती सापडेल त्याने ते एकमेकांना मारत होते. यात नवरीकडील 6 लोक जखमी झाले. घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर नवरदेवाला वरात परत घेऊन जावी लागली.

या घटनेबाबत नवरीच्या वडिलांनी सांगितलं की, "सोमवारी रात्री त्यांच्या दोन मुलीचं लग्न होतं. मोठ्या मुलीचं लग्न आधी शांतपणे पार पडलं. पण लहान मुलीच्या लग्नावेळी वाद झाला. नवरदेवाने जबरदस्तीने नवरीला किस केलं. यावरून घरातील लोक भडकले आणि दोन्हीकडील लोकांमध्ये हाणामारी झाली".

पोलिसांनी काही लोकांना अटक केली. याप्रकरणी एसपी अभिषेक शर्मा यांनी सांगितलं की, लग्नात गोंधळ झाल्याची माहिती मिळाली होती. सध्या याबाबत दोन्हीकडून काही तक्रार दाखल करण्यात आली नाही. तक्रार मिळाली तर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न