डान्स म्हणजेच, नृत्य... अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, डान्स करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. डान्स करण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. पण सर्वांनाच ते येतात असं नाही. मग काय झालं? डान्स करण्यासाठी यांपैकी एखादा प्रकार यावा असं काही नाही. कोणीतरी सांगितलं आहे, डान्स करण्यासाठी काही शिकण्याची अजिबात गरज नाही. बिनधास्त आणि दिलखुलास नाचा, पण मनापासून नाचा. काही दिवसांपूर्वी कुत्रे आणि डान्सर्सच्या फोटोंची एक सिरीज समोर आली आहे. 

पति-पत्नीने केलं हे काम 

Kelly Pratt आणि Ian Kreidich या जोडप्याने हे फोटो कॅप्चर केले आहेत. यामध्ये त्यांनी डान्सर्स आणि कुत्र्यांचे एकत्र फोटो कॅप्चर केले आहेत. 

100 डान्सर्स, 100 कुत्रे आणि 10 देश 

जोडप्याने या फोटोंच्या सिरीजसाठी 100 डान्सर्स, 100 कुत्रे आणि जगभरातील 10 शहरांची निवड केली आणि त्यानंतर फोटोशूट केलं आहे. यासाठी त्यांना तब्बल अडिच वर्षांचा कालावधी लागला. 

इन्स्टाग्रामवर आहे स्पेशल पेज 

dancersanddogs नावाचं इन्स्टाग्राम पेज आहे. ज्यावर त्यांनी हे फोटो अपलोड केले आहेत. हे पेज 1 लाख 10 हजार लोक फॉलो करत आहेत. तसेच फोटो सेशनसाठी निवडण्यात आलेले सर्व डान्सर्स बॅले डान्सर्स आहेत. 

पाहूयात त्यांचं हटके फोटोशूट :  


Web Title: These dancers and dogs photos will make you feel dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.