राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:00 IST2026-04-17T06:59:38+5:302026-04-17T07:00:08+5:30

Heat Wave In Maharashtra: राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

Heat wave across the state; Next 4 days important, warning for Madhya Maharashtra, Marathwada, Vidarbha, Konkan | राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा

राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा

मुंबई - राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस घ्यावे, सैल कपडे वापरावेत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व मुलांची काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत.

पावसाची हलकी सर, उष्णतेचीही बसणार झळ
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या 
ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
१६ ते १८ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. 

साताऱ्यात माणमध्ये उष्माघाताचा बळी? 
सातारा शहरातील तापमानाची गुरुवारी ४१.२ अंशाची नोंद झाली असून, माण तालुक्यात एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याचे सांगण्यात येते. हणुमंत काशीनाथ चव्हाण शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. त्यावेळी थकवा जाणवल्याने झाडाखाली बसले. पण, चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title : महाराष्ट्र में लू का अलर्ट; अगले 4 दिन महत्वपूर्ण, चेतावनी जारी

Web Summary : महाराष्ट्र में भीषण गर्मी की लहर का खतरा। मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, विदर्भ और कोंकण में उच्च तापमान और उमस की संभावना है। नागरिकों को सावधानी बरतने, हाइड्रेटेड रहने और दोपहर में धूप से बचने की सलाह दी जाती है। कुछ क्षेत्रों में हल्की बारिश की संभावना है। सतारा में एक किसान की लू लगने से मौत।

Web Title : Heatwave Alert Across Maharashtra; Next 4 Days Critical, Warnings Issued

Web Summary : Maharashtra faces a severe heatwave. High temperatures and humid conditions are expected, especially in central Maharashtra, Marathwada, Vidarbha, and Konkan. Citizens are urged to take precautions, including hydration and avoiding midday sun exposure. Light rain expected in some regions. A farmer in Satara reportedly died from heatstroke.