IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाचव्या सामन्यानंतर अपराजित राहणारा पंजाब किंग्स हा एकमेव संघ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:03 IST2026-04-17T07:38:49+5:302026-04-17T08:03:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Points Table After MI vs PBKS Match 24 Punjab Kings Rise To No 1 As Mumbai Indians Struggle At Ninth | IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!

IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!

IPL 2026 Points Table After MI vs PBKS Match 24 : आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामात 'सरपंच' श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स जेतेपदाचा दुष्काळ  संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. गुरुवारी वानेखेडेच्या मैदानात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर त्यांनी घरच्या मैदानात खेळणाऱ्या हार्दिक पांड्याच्यामुंबई इंडियन्सला चारीमुंड्याचित करत गुणतालिकेत अव्वलस्थानी कब्जा करत यंदाच्या हंगामात जेतेपदाचा डाव साधण्यासाठी तयार आहोत, याचे संकेतच दिले आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ सलग चौथ्या पराभवासह नवव्या स्थानावर आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाच सामन्यानंतरही अपराजित राहून PBKS संघ ठरला अव्वल

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाचव्या सामन्यानंतर अपराजित राहणारा पंजाब किंग्स हा एकमेव संघ आहे. त्यांनी चार सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णत राहिला होता. ४ विजय आणि अनिर्णित सामन्यात मिळालेल्या एका गुणासह पंजाब किंग्सचा संघ ९ गुण कमावत अव्वलस्थानी पोहचला आहे.

MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला

RCB आणि RR समान गुण, पण....

गत चॅम्पियन आरसीबीचा संघही यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करत असून ५ सामन्यातील ४ विजय आणि एका पराभवासह ते ८ गुण गमावत (+१.५०३) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून राजस्थान रॉयल्सचा संघानेही ५ सामन्यानंतर  ४ विजय आणि एका पराभवा ८ गुण खात्यात (+०.८८९) जमा करत तिसऱ्या स्थानावर आहे. 

पाच संघांच्या खात्यात जमा आहेत प्रत्येकी ४-४ गुण

काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या, संघाने ५  सामन्यानंतर २ विजय आणि ३ पराभवासह  ४ गुणांची कमाई केली असून अन्य चार संघाच्या तुलनेत उत्तम निव्वळ धावगतीच्या (+०.५७६) जोरावर ते टॉप ४ मध्ये आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असून दोन्ही संघांनी अन्य संघाच्या तुलनेत एक सामना कमी खेळला आहे. पाचव्या सामन्यानंतर या दोन्ही संघाकडे टॉप ४ मध्ये पोहचण्याची संधी असेल. लखनौ सुपर जाएंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी पाच सामन्यानंतर प्रत्येकी २-२ विजय नोंदवले असून हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानवर आहेत.

MI सह पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणारा KKR चा संघ तळाला

मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली. पण त्यानंतर सलग चार सामन्यातील पराभवामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने अजून विजयाचे खातेही उघडलेले नाही. एका अनिर्णित सामन्यातील एका गुणासह ते सर्वात तळाला आहेत.
  

Web Title : आईपीएल 2026 अंक तालिका: पंजाब शीर्ष पर, मुंबई का संघर्ष जारी।

Web Summary : पंजाब किंग्स ने मुंबई इंडियंस को हराकर आईपीएल 2026 में दबदबा बनाया, अंक तालिका में शीर्ष पर है। एमआई का संघर्ष जारी है, नीचे के पास स्थित है। आरसीबी और आरआर करीब से पीछे हैं। केकेआर सबसे नीचे है।

Web Title : IPL 2026 Points Table: Punjab tops, Mumbai struggles continue.

Web Summary : Punjab Kings dominates IPL 2026, leading the points table after defeating Mumbai Indians. MI's struggles continue, positioned near the bottom. RCB and RR trail closely. KKR is at the bottom.