कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:27 IST2026-04-17T09:18:38+5:302026-04-17T09:27:53+5:30

नाशिक टीसीएस प्रकरणातील निदा खानबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Location of Wanted TCS HR Manager Nida Khan Traced to Mumbai Accused of Forcing Religious Practices | कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर

कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर

Nashik TCS Nida Khan: नाशिकच्याटाटा कंसल्टेंसी सर्विसेजमधील धर्मांतर आणि लैंगिक छळवणुकीच्या रॅकेटने कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील ९ मुख्य आरोपींपैकी ८ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, मात्र या प्रकरणात सर्वात महत्त्वाची असलेली निदा खान अजूनही फरार आहे. आता ती मुंबईत असल्याची खात्रीलायक माहिती एसआयटीला मिळाली असून तिची धरपकड करण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

कोर्टात धाव आणि 'प्रेग्नेंसी'चा दावा

कारवाईच्या भीतीने फरार असलेल्या निदा खानने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, निदा खानच्या कुटुंबीयांनी ती गर्भवती असल्याचा दावा केला आहे. कायदेशीर कारवाईत सवलत मिळवण्यासाठी याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस अधिकृत वैद्यकीय तपासणीनंतरच कुटुंबियांनी केलेला दावा योग्य आहे का ठरवणार आहेत.

ऑफिसमधील दबंग प्रतिमा

तपासात निदा खानबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑफिसमध्ये तिची प्रतिमा एका दबंग महिलेसारखी होती, ज्याला कर्मचारी घाबरायचे. ती महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालण्यास भाग पाडायची. इतकेच नाही तर बुरखा कसा घालायचा, याचे धडेही ती ऑफिसमध्ये द्यायची. जेव्हा पीडित कर्मचारी टीम लीडर्सविरुद्ध छळाची तक्रार घेऊन तिच्याकडे जात, तेव्हा ती हे सगळं चालतच असतं, असं म्हणून विषय दाबायची.

धर्मांतरासाठी दबाव

कर्मचाऱ्यांवर नमाज पडण्यासाठी आणि सक्तीने मांसाहार करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निदा सक्रिय होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

टेलीकॉलर ते एचआर असल्याचे नाटक

माध्यमांच्या वृत्तानुसार, निदा खान कंपनीत केवळ टेलीकॉलर म्हणून काम करत होती, मात्र ती स्वतःची ओळख एचआर हेड अशी सांगत कर्मचाऱ्यांना दाबत होती. १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना हे रॅकेट प्रामुख्याने टार्गेट करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

हिंदू देवतांचा अपमान आणि सक्तीचा मांसाहार

तक्रारदारांनी आरोप केला की, या टोळीने फक्त शारीरिक आणि मानसिक छळच केला नाही, तर हिंदू देवदेवतांचा अपमान करणे आणि कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम केले. एका पुरुष कर्मचाऱ्यानेही धार्मिक छळाची तक्रार नोंदवली आहे.

नाशिक पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक नेमले असून, निदा खानला लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

Web Title : नाशिक की निदा खान गायब: ठिकाना मिला, परिवार का दावा, गर्भवती!

Web Summary : नाशिक टीसीएस धर्मांतरण रैकेट की मुख्य आरोपी निदा खान फरार है। मुंबई में मिली। परिवार का दावा है कि वह गर्भवती है, कानूनी रियायत चाहती है। उसने कथित तौर पर काम पर इस्लामी प्रथाओं को मजबूर किया और उत्पीड़न की शिकायतों को दबा दिया।

Web Title : Nashik's Nida Khan Missing: Location Found, Family Claims Pregnancy

Web Summary : Nida Khan, key accused in Nashik TCS conversion racket, is absconding. Last spotted in Mumbai. Family claims she is pregnant to seek legal leniency. She allegedly forced Islamic practices at work and suppressed harassment complaints.