Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?

मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?

Gautam Adani Richest Person In Asia: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:02 IST2026-04-17T09:02:14+5:302026-04-17T09:02:14+5:30

Gautam Adani Richest Person In Asia: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे.

Gautam Adani overtakes Mukesh Ambani becomes Asias richest person How much is his net worth Bloomberg billionaire | मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?

मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?

Gautam Adani Richest Person In Asia: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे. 'ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्स'नुसार, अदानी यांची एकूण संपत्ती (Net Worth) आता ९२.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचलीये. या वर्षात त्यांच्या संपत्तीत ८.१० अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १९ व्या क्रमांकावर पोहोचलेत. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांची संपत्ती ९०.८ अब्ज डॉलर्स इतकी राहिली असून, या वर्षात त्यांच्या संपत्तीत १६.९ अब्ज डॉलर्सची घट झाली.

शेअर बाजारातील स्थिती

गुरुवारी भारतीय शेअर बाजारात किरकोळ घसरण पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून बंद झाला. मात्र, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी राहिल्यानं गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ३.५६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्याच वेळी अंबानी यांच्या संपत्तीत ७६.७ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. रिलायन्सचा शेअर गुरुवारी जवळपास स्थिर बंद झाला होता. सध्या अंबानी आशियात दुसऱ्या आणि जगात २० व्या क्रमांकावर आहेत.

छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR

कोणाकोणाच्या संपत्तीत झाली घट?

या वर्षात जगातील पहिल्या २० श्रीमंत व्यक्तींपैकी ७ जणांच्या संपत्तीत घट झाली आहे. यामध्ये फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट यांनी सर्वाधिक ४४ अब्ज डॉलर्स गमावले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त संपत्तीत घट झालेल्या यादीत स्टीव्ह बालमर, ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे, स्पेनचे अ‍ॅमेनशिओ ओर्टेगा आणि भारताचे मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.

जगातील टॉप १० श्रीमंत व्यक्ती

एलन मस्क हे ६५६ अब्ज डॉलर्ससह या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत; त्यांच्या संपत्तीत यावर्षी ३६.७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यादीतील इतर प्रमुख व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत:

  • लॅरी पेज: २८६ अब्ज डॉलर्स (दुसरा क्रमांक)
  • जेफ बेजोस: २६९ अब्ज डॉलर्स
  • सर्गेई ब्रिन: २६६ अब्ज डॉलर्स
  • मार्क झुकरबर्ग: २३९ अब्ज डॉलर्स
  • लॅरी एलिसन: २३० अब्ज डॉलर्स
  • मायकेल डेल: १७० अब्ज डॉलर्स
  • जेंसन हुआंग: १६४ अब्ज डॉलर्स
  • बर्नार्ड आरनॉल्ट: १६४ अब्ज डॉलर्स
  • जिम वॉल्टन: १५० अब्ज डॉलर्स

Web Title : गौतम अडानी ने मुकेश अंबानी को पछाड़ा, एशिया के सबसे अमीर बने।

Web Summary : गौतम अडानी एशिया के सबसे अमीर व्यक्ति बने, उन्होंने मुकेश अंबानी को पीछे छोड़ा। अडानी की संपत्ति 92.6 अरब डॉलर तक पहुंची, जो अडानी समूह के शेयरों के प्रदर्शन से बढ़ी। अंबानी की संपत्ति घटकर 90.8 अरब डॉलर हो गई, जिससे वे एशिया में दूसरे स्थान पर हैं। वैश्विक स्तर पर, अडानी 19वें और अंबानी 20वें स्थान पर हैं।

Web Title : Gautam Adani surpasses Mukesh Ambani to become Asia's richest person.

Web Summary : Gautam Adani overtook Mukesh Ambani as Asia's wealthiest individual. Adani's net worth reached $92.6 billion, boosted by Adani Group's share performance. In contrast, Ambani's wealth decreased to $90.8 billion, placing him second in Asia. Globally, Adani ranks 19th, while Ambani is 20th.