Dangerous! 'हा' रेसलर चक्क मायकल जॅक्सनसारखा डान्स करत रिंगमध्ये समोरच्याला धू-धू धुतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 11:27 IST2020-02-27T11:26:24+5:302020-02-27T11:27:01+5:30

साधारणपणे मायकल जॅक्सनचा फॅन म्हटलं की, एकतर डान्सर असतो नाही तर डान्स बघायला आवडणारे असतात. पण....

Meet this wrestlers who look alike Michael Jackson api | Dangerous! 'हा' रेसलर चक्क मायकल जॅक्सनसारखा डान्स करत रिंगमध्ये समोरच्याला धू-धू धुतो!

Dangerous! 'हा' रेसलर चक्क मायकल जॅक्सनसारखा डान्स करत रिंगमध्ये समोरच्याला धू-धू धुतो!

मायकल जॅक्सन आपल्यात आज नसला तरी त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींची आजही चर्चा केली जाते. काही दिवसांपूर्वीच बाबा जॅक्सन नावाच्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशात मायकल जॅक्सचा आणखी एक फॅन चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हा डान्सर नसून रेसलर आहे. 

साधारणपणे मायकल जॅक्सनचा फॅन म्हटलं की, एकतर डान्सर असतो नाही तर डान्स बघायला आवडणारे असतात. पण रेसलर आणि मायकलचा काय संबंध असा प्रश्न पडू शकतो. पण रेसलर मायकल जॅक्सनसारख्या डान्स स्टेप करत करत समोरच्याला मारतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रेसलिंगचा व्हिडीओ ब्राझीलचा आहे. सोशल मीडियातील लोकांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून यात रेसलर मायकल जॅक्सनसारखा डान्स करताना दिसतोय आणि सोबतच समोरच्या व्यक्तीला मारतो देखील आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियात इतका लोकप्रिय झाला की, आतापर्यंत ८० लाख लोकांनी पाहिलाय. इतकेच नाही तर लोक त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत. 

या रेसलरचं नाव Santana Jackson असून तो अमेरिकेतील लॉस वेगास येथील राहणारा आहे.

Santana च्या डान्स मूव्ह्स आणि रेसलिंग दोन्ही गोष्टी लोकांना पसंत पडत आहेत. सांतनाला डान्सची फार आवड आहे. तर रेसलिंगवर त्याचं प्रेम आहे. त्यामुळे तो रेसलिंग करतानाही रिंगमध्ये मायकल जॅक्सनसारखा ड्रेस घालून जातो.


Web Title: Meet this wrestlers who look alike Michael Jackson api