Indian man kills wife Hrithik Roshan crush in Newyork | धक्कादायक! पत्नीचा हृतिकवर होता जीव, पतीने आधी केली तिची हत्या अन् नंतर आत्महत्या!
धक्कादायक! पत्नीचा हृतिकवर होता जीव, पतीने आधी केली तिची हत्या अन् नंतर आत्महत्या!

मत्सर म्हणजे jealousy वाटणे ही मानवी भावना आहे. पण याने अनेकदा खूप वाईट गोष्टी घडतात. याच मत्सरामुळे अमेरिकेतील एका पतीने त्याच्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. ही घटना आहे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील. पत्नीची हत्या करण्याचं कारण केवळ हे होतं की, त्यांची पत्नी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची फॅन होती.

न्यूयॉर्क डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, ३३ वर्षीय दिनेश्वर बुद्धिदात याने पत्नी डोने डोजॉयची शुक्रवारी हत्या केली. डोने ही बारडेंडर म्हणून काम करायची. असे सांगितले जात आहे की, दिनेश्वर हा त्याच्या पत्नीसोबत नेहमीच अपमानजनक वागत होता. तो अनेकदा तिच्यावर संतापायचा. अनेकदा त्याने पत्नीला मारझोडही केली होती. इतकेच नाही तर ऑगस्टमध्ये तो याप्रकरणी तुरुंगातही गेला होता.

आधी तिची हत्या नंतर आत्महत्या

पत्नीची हत्या केल्यावर दिनेश्वरला अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. पण त्याला अटक कऱण्याआधीच त्याने आत्महत्या केली होती. डोनेच्या हत्येनंतर तिचे काही मित्र-मैत्रिणी समोर आलेत. त्यांनी सांगितले की, डोने जेव्हाही हृतिकचे सिनेमे बघायची किंवा त्याची गाणी गायची तेव्हा दिनेश्वरला फार राग यायचा. डोनेचा क्रश हृतिकला टीव्हीवर पाहून दिनेश्वर विचित्र व्यवहारही करायचा.


Web Title: Indian man kills wife Hrithik Roshan crush in Newyork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.