'Snake Free' State: भारतात जवळपास ३५० प्रजातींचे साप आढळतात. या प्रजातींमध्ये सतत वाढही होत आहे. देशाच्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये साप आढळतात. मात्र, भारतात एक असंही राज्य आहे, जिथे एकही साप आढळत नाही. तर केरळला सापांचं घर म्हटलं जातं. कारण केरळ राज्यात सगळ्यात जास्त प्रजातींचे साप आढळतात.
एका रिपोर्टनुसार, भारतात आढळणाऱ्या सापांमध्ये केवळ १७ टक्के असे साप आहेत जे विषारी आहेत बाकी साप विषारी नसतात. पण भारतातील एक साप न आढळणाऱ्या राज्याबाबत तुम्हाला माहीत नसेल. हे राज्य लक्षद्वीप आहे. इथे साप नाहीत.
लक्षद्वीप एक केंद्र शासित प्रदेश आहे आणि हे ३६ छोट्या छोट्या बेटांनी मिळून बनलं आहे. लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या जवळपास ६४ हजार इतकी आहे. एकूण ३२ वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या लक्षद्वीपमधील ९६ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. बाकी इथे हिंदू, बौद्ध आणि इतर धर्माचे लोक आहेत.
लक्षद्वीपमध्ये भलेही ३६ बेट आहेत, पण यातील केवळ १० वरच लोक राहतात. कावारात्ती, अगाट्टी, अमिनी, कदमत, किलातन, चेतलाट, बिट्रा, आनदोह, कल्पनी आणि मिनिकॉय या बेटांवरच लोकवस्ती आहे. काही बेटांवर राहणाऱ्या लोकांची संख्या तर १०० पेक्षाही कमी आहे.
लक्षद्वीपला येणाऱ्या पर्यटकांना इथे त्यांचा पाळिव कुत्रा नेण्यास मनाई आहे. इथे कावळ्यासारखे पक्षी खूप आढळतात. पिट्टी बेटावर एक अभयारण्य आहे. या बेटावर 'समुद्री गाय' आढळतात. हा जीव लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
जर जगाबाबत सांगायचं तर आयरलॅंड एक असा देश आहे, जिथे एकही साप नाही. कारण इथे साप जिवंत राहतील असं वातावरणच नाही. तसेच न्यूझीलॅंडमध्येही साप आढळला नाही.