UP girl ran away from the house with 4 boys confused over marriage panchayats took decisions | १, २ नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत मुलगी पळाली; लग्नासाठी कन्फ्यूज झाल्यानंतर ‘असा’ निवडला जोडीदार

१, २ नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत मुलगी पळाली; लग्नासाठी कन्फ्यूज झाल्यानंतर ‘असा’ निवडला जोडीदार

आपण अनेक बातम्या वाचत असतो, सोशल मीडिया आल्यापासून बातम्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. सध्या आम्ही तुम्हाला अशी बातमी देतोय ती ऐकून तुमच्या डोक्यात अनेक विचार घोंगावतील, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील आहे, येथे एक मुलगी लग्न करण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ४ मुलांसोबत घरातून पळाली. पण नेमकं त्या चौघांपैकी कोणाला नवरा बनवायचं यात ती कन्फ्यूज झाली.

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार ही बातमी कोतवाली टांडा येथील आहे, ५ दिवसांपूर्वी चार युवकांनी एका मुलीला घरातून पळवून आणलं, त्यांनी २ दिवस नातेवाईकांपासून मुलीला लपवून ठेवलं, पण त्यानंतर सगळ्यांना पकडलं, वास्तविक मुलीच्या घरच्यांनी कायद्याचा धाक दाखवला तर हे प्रकरण पंचायतीसमोर पोहचले. पंचायतीने मुलीसमोर प्रस्ताव ठेवला की, तू या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करण्यास तयार आहे? त्यावेळी या मुलीचाही गोंधळ उडाला.

पंचायतीसमोर पेच उभा राहिल्यानंतर त्यांनी चारही मुलांच्या नावाने चिठ्ठी उडवली आणि एका लहान मुलाच्या हातातून त्यातील एक उचलण्यात आली, मुलाने चिठ्ठी उचलताच तीन दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ संपला आणि मुलीने चिठ्ठीत ज्या मुलाचे नाव आले त्याच्यासोबत लग्नाची गाठ बांधली,

Web Title: UP girl ran away from the house with 4 boys confused over marriage panchayats took decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.