शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 13:35 IST

ग्राहकांना सतर्क करणाऱ्या पोलिसांच्या ट्विटची जोरदार चर्चा

शिलाँग: देशाच्या सर्वच राज्यांमधील पोलीस विभाग सोशल मीडियावर सक्रीय होत आहेत. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन होत असलेली ट्विट्स अनेकदा लक्षवेधीही ठरत आहेत. मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस यात आघाडीवर असताना आता छोट्या राज्यांच्या पोलीस दलांच्या ट्विट्सचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. कोणाचा ५९० किलो गांजा हरवला आहे का, असा प्रश्न पोलिसांनी ट्विटरवर विचारला होता. यानंतर आता मेघालय पोलिसांच्या ट्विटचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. 'घोटाळ्याबद्दल अलर्ट! शिलाँगच्या बाजारात अमली पदार्थांचा तुटवडा आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे त्यांच्या ग्राहकांना रसनाची पावडर देत आहेत,' असं मेघालय पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  'जर तुम्हाला अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीनं रसना दिला असेल, तर त्याची तक्रार कुठे करायची हे तुम्हाला माहिती आहेच. एएनटीएफ टीमचं कौतुक. सीसी: रसना हाऊस,' असंदेखील पोलिसांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटसोबत पोलिसांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये कागदाचे तीन लहान चौकनी तुकडे दिसत असून त्यावर रसना पावडर आहे. सध्या शिलाँगमध्ये अमली पदार्थांचा तुटवडा आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे अनेकजण त्यांच्या ग्राहकांना रसना पावडर देत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थ