पिचकारी मारल्यासारखा १० फूट दूर विष फेकतो हा साप, शिकारीला काही मिनिटांमध्ये करतो आंधळं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:20 IST2026-04-30T16:20:17+5:302026-04-30T16:20:40+5:30
Ashe spitting cobra : सामान्यपणे आपल्याला हे माहीत आहे की, सापाने दंश केल्यावर व्यक्ती एकतर मरतो किंवा जखमी होतो. पण स्पीटिंग कोब्रा असा साप आहे जो दंश न करताही लांबून व्यक्तीला जखमी करू शकतो.

पिचकारी मारल्यासारखा १० फूट दूर विष फेकतो हा साप, शिकारीला काही मिनिटांमध्ये करतो आंधळं
Ashe spitting cobra : जगभरात हजारो प्रजातींचे साप आहेत. काही साप तर इतके चपळ आणि खतरनाक असतात की, दंश न करताही दुरूनच ते आपल्या शिकारीला जखमी करू शकतात. त्यातीलच एक म्हणजे स्पीटिंग कोब्रा. हा साप मु्ख्यपणे आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळतो. सामान्यपणे आपल्याला हे माहीत आहे की, सापाने दंश केल्यावर व्यक्ती एकतर मरतो किंवा जखमी होतो. पण स्पीटिंग कोब्रा असा साप आहे जो दंश न करताही लांबून व्यक्तीला जखमी करू शकतो.
विश्वास बसणार नाही, पण हा साप पिचकारी मारल्यासारखा तोंडातून विष थुंकतो. त्याही आश्चर्याची बाब म्हणजे त्याची ही विषारी पिचकारी जवळपास ३ मीटरपर्यंत म्हणजेच १० फुटापर्यंत जाऊ शकतो. बरं त्यांचा निशाणा इतका परफेक्ट असतो की, जास्तीत जास्त केसेसमध्ये विष थेट डोळ्यांमध्ये जातं. अशे स्पीटिंग कोब्राची सरासरी लांबी ही १.३ ते २ मीटर इतकी असते. एका सापाची लांबी २.७ मीटर इतकी होती. जड शरीर आणि मोठं मुंडक त्याला खतरनाक बनवतं. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हा तो फणा काढतो आणि समोर असलेल्याच्या डोळ्यांवर निशाणा साधत विषाची मोठी धार फेकतो.
वैज्ञानिक काय सांगतात?
वैज्ञानिक सांगतात की, स्पीटिंग कोब्रा त्यांच्या दातांच्या खास छिद्रातून प्रेशरने विषाचा मारा करतो. अशे स्पीटिंग कोब्राची क्षमता इतकी जास्त असते की, ते ८ ते १० फुटापर्यंत परफेक्ट निशाणा साधू शकतो. त्याच्या विषात मुख्यपणे सायटोटॉक्सिक असतं, ज्याने पेशी नष्ट होतात. हे डोळ्यात गेल्यावर जळजळ होते, सूज येते आणि वेदना सुरू होतात. जर वेळीच डोळे धुतले नाही तर कॉर्निया डॅमेज होऊ शकतो आणि नेहमीसाठी दिसणं बंद होऊ शकतं. हा साप फार वेगाने सरपटूनही आपली शिकार पकडतो. अनेकदा असंही आढळून आलं की, तो फणा न काढता किंवा जास्त हालचाल न करताही विष फेकू शकतो. निशाणा असा असतो की, शिकार किंवा व्यक्ती प्रयत्न करूनही वाचू शकत नाही.
विषाची पिचकारी का मारतो?
आफ्रिकेत स्पीटिंग कोब्रा घरांच्या आसपास आढळतात. ते रात्री शिकारीवर निघतात. स्पीटिंगची कोब्रा क्षमता आणि त्याची शक्ती पाहून लोक घाबरतात. एक्सपर्ट सांगतात की, स्पीटिंग कोब्राचं हे वागणं मुख्यपणे संरक्षणात्मक असतं. ते आधी फणा काढून इशारा देतात. जर धोका कायम राहिला तर विष फेकतात. असं करून तो जवळ न जाताही दुश्मनावर हल्ला करू शकतो.