सुरूवातीला पॉपकॉर्न खाण्यासाठी नाही तर 'यासाठी' वापरत होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:50 AM2019-09-17T11:50:55+5:302019-09-17T11:58:27+5:30

पॉपकॉर्न तर अनेकदा खाल्ले असतील पण याच्याशी संबंधित या रोमांचक गोष्टी नक्कीच तुम्हाला माहीत नसतील.

4000 years ago popcorn was not eaten but decorated | सुरूवातीला पॉपकॉर्न खाण्यासाठी नाही तर 'यासाठी' वापरत होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

सुरूवातीला पॉपकॉर्न खाण्यासाठी नाही तर 'यासाठी' वापरत होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

Next

थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलात आणि पॉपकॉर्न खाल्ले नाही तर अनेकांना सिनेमा पूर्ण पाहिल्यासारखा वाटत नाही. पॉपकॉर्न जगभरात लोकप्रिय आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जवळपास ४ हजार वर्षांआधी पॉपकॉर्न खाण्यासाठी नाही तर सजावट करण्यासाठी वापरले जात होते. चला जाणून घेऊ तुमच्या आवडत्या पॉपकॉर्नचा काही रोचक गोष्टी...

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात सर्वातआधी अमेरिकेतील मूळ निवासी पॉपकॉर्न खात होते. नंतर तिथे राहणाऱ्या युरोपियन लोकांनी देखील पॉपकॉर्न खाण्यास सुरूवात केली होती.

जगात पहिल्यांदा पॉपकॉर्न भाजण्याची मशीन १३४ वर्षांआधी म्हणजे १८८५ मध्ये तयार करण्यात आली होती. अमेरिकेत राहणारे चार्ल्स क्रेटरने ही मशीन तयार केली होती. पण त्यावेळी ते शेंगदाणे भाजण्यासाठी एका मशीन तयार करत होते. मात्र, ती नंतर पॉपकॉर्न भाजणारी मशीन झाली.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, इतिहासकार अ‍ॅंड्रयू स्मिथ यांनी लिहिले आहे की, चार्ल्स क्रेटर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांची पॉपकॉर्न भाजण्याची मशीन १८९३ मध्ये वर्ल्ड फेअरमध्ये घेऊन गेले होते. तिथे ते आवाज देऊन लोकांना पॉपकॉर्नची टेस्ट घेण्यासाठी बोलवत होते आणि मशीनसोबत एक बॅग मोफत देणार असं सांगत होते. आज चार्ल्स क्रेटरची कंपनी अमेरिकेतील पॉपकॉर्न भाजणाची मशीन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

असे म्हटले जाते की, कॉर्नचा शोध जवळपास ४ हजार वर्षांआधी न्यू मेक्सिकोमध्ये लागला होता. तेव्हा पॉपकॉर्न वटवाघूळांच्या गुहेत सापडले होते. पण त्यावेळी कुणाला हे माहीत नव्हतं की, हे खाताही येऊ शकतात. त्यामुळे त्यावेळी यांचा वापर सजावटीसाठी केला जात होता. तसेच यापासून डोक्यावर आणि गळ्यासाठी दागिने तयार केले जात होते.

Web Title: 4000 years ago popcorn was not eaten but decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.