शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? वाळवंटी प्रदेशात आढळली तब्बल 2000 वर्षे जुनी 121 फुटांची "मांजर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 16:43 IST

Cat Geoglyph : अलास्काहून अर्जेंटिनाला जाणाऱ्या एका महामार्गाच्या जवळील एका डोंगराजवळ मांजरीची ही आकृती आहे.

लिमा - पेरूमधील वाळवंटी प्रदेशात पृथ्वीवरील पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे 2200 वर्षे जुन्या मांजरीचं मोठं रेखाचित्र (Geoglyphs) आढळलं आहे. मांजरीची आकृती ही तब्बल 121 फूट लांब असून ती नाज्का संस्कृतीचा भाग असल्याचं म्हटल जात आहे. आतापर्यंत या भागात अनेक मोठ्या आकाराच्या आकृत्या आढळल्या आहेत. अलास्काहून अर्जेंटिनाला जाणाऱ्या एका महामार्गाच्या जवळील एका डोंगराजवळ मांजरीची ही आकृती आहे.

 नाज्का लायन्समध्ये आतापर्यंत 300 हून अधिक वेगवेगळ्या आकारांच्या आकृत्या आढळल्या आहेत. यामध्ये पशू आणि ग्रहांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जॉनी इस्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पर्यटकांसाठी बनवण्यात आलेले पॉईंट्स स्वच्छ करत असताना मांजरीचे रेखाचित्र आढळून आले. पर्यटकांना सहजपणे रहस्यमयी नाज्का लाइन्स पाहता यावेत यासाठी ही स्वच्छता करण्यात येत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी त्या काळातील लोकांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाविना ही चित्रे तयार केली होती. 

ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे छायाचित्र घेण्यास यशस्वी

फक्त आकाशातूनच ही चित्रे दिसू शकतात अशी माहितीही त्यांनी दिली आहे. इस्ला यांनी आम्ही रेखाचित्रांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करत असताना आम्हाला काही रेषा आढळल्या. या रेषा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे आढळून आले असं सांगितलं आहे. तसेच आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारच्या रेषा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मागील काही वर्षात आम्ही ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे छायाचित्र घेण्यास यशस्वी झालो असल्याची माहिती त्यांनी दिली.

मांजरीची आकृती 121 फूट लांबीची

पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक आठवड्यांपर्यंत संरक्षण आणि स्वच्छतेची कामे केल्यानंतर मांजरीची आकृती दिसून आली. ही संपूर्ण आकृती 121 फूट लांबीची आहे. या मांजरीच्या आकृतीला इसवी सनपूर्व 2000 मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती पुरात्वविभागाने दिली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेरूच्या या वाळवंटी प्रदेशात 140 नाज्का लाइन्स आढळून आल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके