अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 14:32 IST2021-08-27T10:29:19+5:302021-08-27T14:32:05+5:30

अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला आहे.

Young man strangled to death in Amalnera | अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या

अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या

 

 

 


संजय पाटील
अमळनेर, जि. जळगाव : शहरातील नगरपालिकेच्या हशमजी प्रेमजी व्यापारी संकुलात एका ३५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या झाल्याची घटना २७ रोजी पहाटे घडली. अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला असून, पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे समजते. प्रकाश दत्तू चौधरी (वय ३५, रा. गांधलीपुरा, अमळनेर) असे मयताचे नाव आहे.

घटनेचे वृत्त कळताच रजेवर असलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. हा इसम गांधलीपुरा भागातील प्रकाश दत्तू चौधरी (वय ३५) असल्याचे समजले.

दरम्यान, पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे समजते. अवघ्या तीन तासात पोलिसांनी हा खून कैलास पांडुरंग शिंगाणे याने केल्याचे निष्पन्न केले.

आरोपी कैलास फरार झाला असून त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

 

 

Web Title: Young man strangled to death in Amalnera