शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

तु नव-याला सोडून दे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे...नाही तर मी मरून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 8:41 PM

धमकी देत विवाहितेवर अत्याचार : शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव : तु नव-याला सोडून दे, मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे. नाही तर मी मरून जाईल...अशी धमकी देत २२ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दिनेश जाधव (२१, रा. राजमालतीनगर) असे अत्याचार करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.शहरातील राजमालती नगरातील आकाश दिनेश जाधव या तरुणाचे एका २२ वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. विवाहितेचा पती घरी नसताना आकाश हा तिच्या घरी जात तिला मी मरुन जाईल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करायचा. त्यानंतरही आकाश हा विवाहितेला वारंवार धमकी देत होता. ११ नोव्हेंबर रोजी तो विवाहितेला घेवून बसने नागपूर गेला. नंतर तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावली तालुक्यातील मांजरी येथे विवाहितेला घेवून गेला. त्याठिकाणी त्याने विवाहितेच्या मनाविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करायचा. त्याला विवाहितेने विरोध केला असता त्याच्याकडून मारहाण करीत शिवीगाळ करायचा, असे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केल आहे.अजिंठा चौफुलीला सोडून आकाश पसारदरम्यान, काही दिवस मांजरी येथे राहिल्यानंतर आकाशने त्या विवाहितेला तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जातो असे सांगून २६ नोव्हेंबरला तो विवाहितेला सोबत घेवून रेल्वेने भुसावळपर्यंत आला. भुसावळातून जळगावपर्यंत बसने प्रवास करीत दोघे जळगावात आले. त्यानंतर आकाशने विवाहितेला अजिंठा चौफुलीपर्यंत सोडले आणि तो याठिकाणाहून पसार झाला.पीडितेने गाठले पोलीस ठाणेअंजिठा चौफुलीजवळ सोडल्यानंतर विवाहिता रिक्षाने टॉवर चौकात आली. तिने तिच्या आईला फोन लावला. नंतर आई त्याठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपुर्ण हकिकत सांगितली. दरम्यान, त्यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल होती. मात्र, मंगळवारी विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याठिकाणी तिने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश दिनेश जाधव याच्याविरुद्ध अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव