शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराची लाच घेताना महिला अभियंता अटकेत

By admin | Updated: March 9, 2017 00:27 IST

भुसावळ : लाचखोरीविरुद्ध अशिक्षित मजूर महिलेने खोचला पदर

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील महिलेकडून घरकुलाच्या कामाच्या अनुदानाचा तिसरा टप्पा मिळवून देण्यासाठी एक हजाराची लाच घेताना येथील पंचायत समिती कार्यालयातील महिला अभियंता भाग्यश्री शिंदे  यांना अटक करण्यत आली. ही घटना जागतिक  महिलादिनी ८ रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान पंचायत समिती कार्यालयात घडली. पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील  कंडारी येथील रहिवासी तक्रारदार वीट कामगार महिलेच्या पतीच्या नावाने इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले असून, अनुदानाच्या रकमेचे तीनपैकी दोन टप्पे प्राप्त झाले आहेत.  अनुदानाचा मंजूर तिसरा टप्पा घेण्यासाठी तक्रारदार येथील पंचायत समिती कार्यालयात आल्या असता, गृहनिर्माण विभागाच्या अभियंता   भाग्यश्री शिंदे यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.तक्रारदार महिलेने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सर्वत्र महिला दिनाचा उत्साह साजरा होत असताना दुसरीकडे येथील पंचायत समिती कार्यालयात दुपारी ३.३० वाजता  भाग्यश्री शिंदे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटनेमुळे महिला दिनाच्या नंतर झालेल्या विविध कार्यक्रमांवर विरजण पडले.याबाबत शहर पोलीस ठाण्यात  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे व सहकारी करीत आहेत.विशेष म्हणजे तक्रारदार महिला ही वीटभट्टीवर रोजंदारीने काम करते. अशिक्षित असूनही तिने लाचखोरीविरुद्ध पदर खोचला आणि महिलादिनी लाचखाऊ अधिकारी महिलेचा बुरखा फाडला. मजुरी करणाºया अशिक्षित महिलेने सुशिक्षित महिलेस अशा पद्धतीने उघडे पाडले. याबद्दल या अशिक्षित महिलेचे सोशल मीडियावरून दिवसभर तेवढेच कौतुकही करण्यात येत होते.