शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद ग्रामपंचायतीची धुरा कोणाकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

ममुराबाद : गावातील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) पुुरुषसाठी राखीव निघाल्याने ग्रामपंचायतीची धुरा नेमकी कोणाकडे जाते? त्याकडे आता ...

ममुराबाद : गावातील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) पुुरुषसाठी राखीव निघाल्याने ग्रामपंचायतीची धुरा नेमकी कोणाकडे जाते? त्याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरपंचपदासाठी इच्छुकांकडून सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली असून निवडणुकीची तारीख घोषित होताच संबंधित सर्व सहलीला रवाना होण्याच्या तयारीत आहेत.

सहा वॉर्डातील १७ जागांसाठी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. गेल्या वेळी सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. यंदा नेमके कोणते आरक्षण निघते त्याबद्दल संबंधितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सरपंचपदाचे आरक्षण मनाजोगते निघावे म्हणून अनेकांनी देव पाण्यातसुद्धा ठेवले होते. त्यातील काहींनी अंदाज बांधून आरक्षण घोषित होण्यापूर्वी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. प्रत्यक्षात सरपंचपदाचे आरक्षण नेमके नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषसाठी राखीव निघाल्याने अनेकांच्या आशेवर सपशेल पाणी फेरले गेले. तर ज्यांच्या मनासारखे आरक्षण निघाले त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही.

प्राप्त माहितीनुसार गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव पुरुषाच्या जागेवर फक्त दोनच सदस्य निवडून आले आहेत. अर्थात, त्या दोघांमध्येच सरपंचपदाची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. वॉर्ड एकमधून यंदा सहाव्यांदा निवडलेले हेमंत गोविंद चौधरी आणि वॉर्ड दोनमधून यंदा प्रथमच निवडलेले शैलेंद्र यशवंत पाटील या दोघांचा त्यात समावेश आहे.

---------------------

चौधरी की पाटील सरपंच ?

हेमंत चौधरी यांनी यापूर्वी २००३ मध्येही काही काळ ममुराबाद ग्रामपंचायतीचे सरपंचपदसुद्धा भूषविले आहे. तर शैलेंद्र पाटील हे यंदा पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदाचे दावेदार बनले आहेत. १७ पैकी निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ जमवून दोघांपैकी कोण सरपंचपदी विराजमान होते त्याची उत्कंठा ग्रामस्थांना लागली आहे.

------------------------