शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त कामे न करण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:31 IST

जि़ प़ समोर धरणे: वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा

जळगाव : आधीच १५५ योजना राबविण्याची जबाबदारी असताना अनेक अतिरिक्त कामे सोपविली जातात, यामुळे मानसिक तणावात असल्याने आता अतिरिक्त कामे न करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचे सांगत जोपर्यंत वेतनश्रेणीबाबत ठोस आश्वासने मिळत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा राज्य ग्रामसेवक युनियन डी़ एऩ ईने घेतला आहे़संघटनेतर्फे सहाशे ते सातशे ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली़ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतनत्रृटी दूर व्हावी, राज्यभर सजे व पदे वाढ करणे, प्रवास भत्ता मंजूर करणे, पदवीधर ग्रामसेवक नेमणुका होणे या मागण्यांसाठी सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन करण्यात आले़ संघटनेला शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे़ जनतेला वेठीस धरायचे नसल्याने कामबंद आंदोलन केले नाही, मात्र, शासनाने दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन केले जाईल, तसेच फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे राज्य कोषाध्यक्ष संजय निकम यांनी सांगितले़ १६ आॅगस्ट रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन होणार असून जिल्हाभरातून मोठी उपस्थिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, सरचिटणीस संजय भारंबे, उपाध्यक्ष अशोक खैरनार, कार्याध्यक्ष सी़ एम़ सोनवणे, महिला संघटक रूपाली साळुंखे, कल्याणी पाटील, मानद अध्यक्ष जी़ एम़ पवार, मानद सचिव गौतम वाडे व ग्रामसेवक उपस्थित होते़रक्षा खडसे यांचा पाठिंबाग्रामसेवकांच्या धरणे आंदोलनास खासदार रक्षा खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले़ आंदोलनाला जि़ प़ उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील आदींनी भेटी दिल्या़

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव