शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्या विनयेन शोभते..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:34 IST

सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता.

- दत्ता कोहिनकर- 
    सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्रह्य विनित। जिस डाली को फल लगे-  झुकने कि ही रीत॥ मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का? चॅप्लीनन उत्तर दिलं कि त्याचं घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले, तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी तसे केलं सुद्धा. पुढे चॅप्लीनन लिहिलंय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माझ्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. मित्रांनो...खरोखर आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्रता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता,मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय. म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु  वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी नम्र रहा.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक