शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय डॉक्टर, कर्मचारी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

पारोळा : तालुक्यातील उंदिरखेडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला आमदार चिमणराव पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी दवाखान्यात एकही कर्मचारी ...

पारोळा : तालुक्यातील उंदिरखेडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला आमदार चिमणराव पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी दवाखान्यात एकही कर्मचारी आढळून आला नाही. याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता ग्रामस्थांनी या दवाखान्याच्या समस्यांबाबत पाढाच वाचला. गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही वेळा डॉक्टर, कर्मचारी आलेला नाही. त्यामुळे आमची गुरे-ढोरे पूर्णपणे वाऱ्यावर आहेत. जनावरांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने आमची खूप मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी आमदारांना सांगितले.

आमदारांनी गाठला तालुक्याचा दवाखाना

याची त्वरित दखल घेऊन आमदार पाटील यांनी तालुक्याचा वैद्यकीय दवाखाना गाठला. दवाखान्यात पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. कदम, विस्तार अधिकारी डॉ. शिसोदे, पर्यवेक्षक डॉ. सूर्यवंशी पशुधन, डॉ. राजेंद्र इंगावले हे अधिकारी उपस्थित होते.

डॉक्टर, कर्मचारी महिना-महिना जात नाही

यावेळी अपूर्ण कर्मचारी, ग्रामीण भागांत पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर, कर्मचारी महिना-महिना जात नाही. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय याचा जाब विचारत उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच रिक्त पदांबाबत त्वरित अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवा व त्याची एक प्रत माझ्याकडे पाठवा. मीदेखील याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुविधा कशा देता येतील याचे नियोजन करा

याशिवाय उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या आधारे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील व त्यांची होत असलेली गैरसोय कशी दूर करता येईल याबाबत नियोजन करून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा सूचना आमदार पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.