शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला भेटून परतताना अपघातात दोन मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST

जळगाव : चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने हर्षल भिका पाटील (वय ...

जळगाव : चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने हर्षल भिका पाटील (वय १९) हा जागीच ठार झाला तर नितीन निंबा भिल (वय २३) याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ऋषीकेश छाेटू पाटील (वय २१, तिघे रा.वाघळूद, ता.धरणगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजता वेले, ता.चोपडा गावाजवळ झाला.

वाघळूद येथील हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं मित्र होते. ऋषीकेशची बहीण चोपडा येथे असल्याने तिला भेटण्यासाठी तिघे शनिवारी सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १९ बीसी ७८०४) गेले होते. तेथून परत येत असताना वेले, ता.चोपडा गावाजवळ समोरुन येणाऱ्या चारचाकीने (क्र.एमएच १८ एबी २३०३) दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहने वेगात असल्याने दुचाकीवरील तिघे जण लांब फेकले गेले. नितीन याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल व ऋषीकेश या दोघांना जखमी अवस्थेत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने हर्षल याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषित केले. ऋषीकेश याच्यावर चोपड्यात उपचार सुरू असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले.

तिघंही एकुलते; नितीनचे दोन महिन्यांपूर्वीच झाले लग्न

हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं आपापल्या कुटुंबात एकुलते होते. नितीन याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते तर हर्षल व ऋषीकेश हे अविवाहित असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. तिघांचे आई, वडील मजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. हर्षलच्या मृत्यूची बातमी समजताच जळगावातील नातेवाईक व गावावरून वडील व इतरांनी धाव घेतली. आत्या व वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.