शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत टाकीतील तीन लाख लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:02 IST

मनपा : पाणी साठवण टाकीत सांडले आॅईल, दुषित पाणीपुरवठ्यानंतर टाकीची केली स्वच्छता

जळगाव : मनपाच्या गिरणा टाकी परिसरातील भूमिगत पाणी साठवण टाकीत आॅईल सांडल्याने रविवारी शहरात अनेक ठिकाणी आॅईलयुक्त दुषित पाणीपुरवठा झाला. या प्रकारानंतर मनपा पाणीपुरवठा विभागाने रविवारी सकाळी आणि सोमवारीदेखील टाकीतील पाणी काढून संपूर्ण टाकीची स्वच्छता केली. आॅईल सांडल्यामुळे भूमिगत टाकीतील तीन लाख लिटर पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर फेकण्यात आले.मनपाने गिरणा टाकी परिसरात सुमारे दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारली आहे. या टाकीवर उच्च क्षमतेच्या इलेक्ट्रीक पंपाचा वापर करून शहरातील विविध जलकुंभामध्ये पाणी सोडण्यात येते. शनिवारी मध्यरात्री भूमिगत टाकीमध्ये पाणीपुरवठा सुरू असताना अचानक विद्युत पंपाच्या दाबामुळे पाणी वर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही कर्मचाऱ्यांनी टाकीतील पाणी वर उडाल्याने पंप हाऊसवरील आॅईलच्या बॅरेलवरील तेलकट भागावर पडून हे पाणी पुन्हा टाकीमध्ये गेले असल्याचा अंदाज वर्तविला.तीन लाख लिटर पाणी गेले वाया... भूमिगत टाकीतील संपूर्ण पाणी आॅईलयुक्त झाल्याने, सोमवारी सकाळीदेखील पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी नळांना दुषित पाणी आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी पंपाद्वारे सोमवारी सकाळपासूनच टाकीतील पाणी बाहेर सोडले.टाकीतून सुमारे दीड ते पावणे दोन लाख लीटर पाणी बाहेर टाकण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.तसेच रविवारीदेखील टाकीतील सर्व पाणी बाहेर काढून टाकी स्वच्छ करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात आॅईलमुळे तीन लाख लीटर पिण्याचे पाणी वाया गेले आहे.रविवारप्रमाणे सकाळीदेखील काही भागात आॅईलयुक्त दुषित पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे पुन्हा पंपाद्वारे भूमिगत टाकीतील पाणी काढून, टाकी स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर संबंधित भागात पुन्हा पाणी पुरवठा करण्यात आला.-सुशील साळुंखे, विभाग प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव