शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलला अज्ञात वाहनाच्या धडकेने तीन मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

याबाबतची माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तिघे मित्र विवेक सुनील पाटील (१६), श्याम राजेंद्र पाटील (१६) ...

याबाबतची माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील तिघे मित्र विवेक सुनील पाटील (१६), श्याम राजेंद्र पाटील (१६) व देवानंद सोपान पाटील (१७) हे मोटारसायकल क्र. एमएच १९ यु ७८६३ ने भुसावळकडून घरी तळवेलकडे परत जात होते. त्या वेळी त्यांच्या मोटारसायकलला फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. मोटासायकलला ही धडक एवढी जोरात होती की तिघे फेकले गेले. त्यात मोटारसायकलस्वार विवेक सुनील पाटील याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर श्याम राजेंद्र पाटील व देवानंद सोपान पाटील या दोघा मित्रांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार घेत असताना त्यांचाही त्यात मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही वेळातच मोठी गर्दी झाली होती. काही जणांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले व जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री उशिरा वरणगाव पोलिसात घटनेप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गावात शोककळा

तळवेल येथील ही तीनही मुले जीवलग मित्र म्हणून प्रसिद्ध होते. कोठेही ते एकत्रच फिरायला जात. विशेष म्हणजे तिघेही घरातील एकुलते असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती कळताच तीनही कुटुंबांत एकच आक्रोश सुरू झाला होता. अपघाताच्या या घटनेमुळे संपूर्ण तळवेल गावावर शोककळा पसरली असून परिसरात तिघा मित्रांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.