चोर ... चोर आरडा-ओरड करताचं टॉमी सोडून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:29 PM2019-11-16T21:29:24+5:302019-11-16T21:29:43+5:30

जळगाव - शहरातील नवीपेठमधील जे़एम़वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल या दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे दोन चोरट्यांच्याकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची ...

Thieves ... Thieves scream and shout, leaving Tommy | चोर ... चोर आरडा-ओरड करताचं टॉमी सोडून चोरटे पसार

चोर ... चोर आरडा-ओरड करताचं टॉमी सोडून चोरटे पसार

Next

जळगाव- शहरातील नवीपेठमधील जे़एम़वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स व उद्धव डिजीटल या दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटे दोन चोरट्यांच्याकडून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे़ दरम्यान, कुलूप तोडण्याचा आवाज आल्यानंतर रस्त्यावरील जात असलेल्या गुरखा धन बहादूर याने सतर्कता दाखवित त्वरित चोऱ़़चोर आरडा-ओरड केली़ गुराख्याला पाहून चोरट्यांनी जागेवरचं टॉमी सोडून धूम ठोकली़ त्यामुळे चोरट्यांचा मोठा चोरीचा प्रयत्न फसला़ गुरख्याने दाखविलेल्या सतर्कतमुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत होते़
पोलन पेठ येथील रहिवासी माजी नगरसेवक जितेंद्र रामकिशन मुंदडा यांचे नवीपेठेत जे़एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ तर शेजारीचं त्यांचे शालक आनंद मंडोरा यांचे उद्धव डिजीटल नावाचे दुकान आहे़ जितेंद्र मुंदडा हे व त्यांचा मुलगा निखिल हे दुकान सांभाळतात़ रोज सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर रात्री ९ वाजता निखिल हा दुकान बंद करून घरी जातो़ गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून निखिल आणि सर्व कार्मचारी घरी निघून गेले़

चोरट्यांनी तोडले कूलूप
शुक्रवारी पहाटे ३़३० वाजेच्या सुमारास मालवाहतूक व दुचाकीवरून आलेले दोन चोरट्यांनी आधी माजीनगरसेवक जितेंद्र मुंदडा यांच्या जे़एम़ वर्ल्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला़ दोन्ही कुलूप तोडल्यानंतर शेजारीचं असलेले उद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरूवात केली़

कुलूप तोडण्यावा आवाज़़़अन् गुरखाने केली आरडा-ओरड
उद्धव डिजीटल या दुकानाचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक कुलूप तोडण्याचा आवाज झाला़ नेहमीप्रमाणे गुरखा धन बहादूर हा त्या परिसरात फेरफटका मारत होता़ त्याला कुलूप तोडण्याचा आवाज येताच त्याने त्याठिकाणी धाव घेतली व अन् समोर चोरटे दिसले़ चोर..चोर.. आरडा-ओरडा करीत त्याने चोरट्यांकडे धाव घेतली़ गुरख्याला पाहून चोरट्यांनी जागेवर दोन टॉमी सोडून धूम ठोकली.

अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

गुरख्याने आरडा-ओरड करताचं परिसरातील नागरिकांनाही जाग आली़ त्यातच गुरख्याने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले़ हा संपूर्ण थरार गुरूवारी मध्यरात्री ४़१५ वाजेच्या सुमारास घडला़ परिसरातील नागरिकांनी देखील चोरटे दिसले़ दरम्यान, रिक्षा व पल्सर चोरट्यांजवळ असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले़ तसेच परिसरातील रहिवाश्यांनी जितेंद्र मुंदडा यांना फोन करून घटनेची माहिती दिली़ व त्यांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली़ यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडलेले आढळून आले़ तसेच एक कूलूप चोरट्यांनी सोबत नेल्याचेही आढळून आले़ पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा यांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात माहिती कळविली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ व सीसीटीव्ही फुटेज तपासले़ दरम्यान, गुराखाने दाखविलेल्या हिंमतीमुळे मोठ्या चोरीचा प्रयत्न फसला़ सुमारे दुकानांमध्ये वीस ते पंचवीस लाखांचा माल होता़

Web Title: Thieves ... Thieves scream and shout, leaving Tommy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.