भुसावळ विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीसींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 16:41 IST2019-11-17T16:41:38+5:302019-11-17T16:41:50+5:30

रेल्वेत महसूल वसूल करण्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या तिकीट तपासणीसांचा सन्मान करण्यात आला.

TC appreciates for outstanding performance in Bhusawal division | भुसावळ विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीसींचा सत्कार

भुसावळ विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीसींचा सत्कार

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेत महसूल वसूल करण्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या तिकीट तपासणीसांचा सन्मान करण्यात आला.
मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर कार्यरत तिकीट तपासणी निरीक्षकांनी आॅक्टोबर महिन्यात रेल्वेचा महसूल मिळवण्यात उत्कृष्ट काम केले. त्यामुळे रेल्वेला जास्त महसूल मिळाला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण ३५ तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, सहाय्यक विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी त्यांचा सन्मान केला.
मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी. पाठक, मेहबूब जंगलू, विनय ओझा, एस.के.दुबे, राजपाल सिंग, आर.के.गुप्ता, पी.एच.पाटील, संजीव जाधव, डी.के.द्विवेदी, आर.के.केशरी, शेख अल्ताफ, शेख जावेद, एस.जे.श्रीवास्तव, मो. आबिदुल्ला, रंजना संसारे, जे.के.शर्मा, ए.के.गुप्ता, पी.के.सिंग, ए.के.मिश्रा, एस.एम. पुराणिक, एम.पी.नजरकर, शेख इमरान, व्ही.एस.पाटील, एस.ए. दहीभाते, विवीयन रॉड्रिक्स, एस.पी.मालपुरे, प्रशांत ठाकूर, एफ.एस.खान, अनिल खर्चे, एम.एन.चव्हाण, वाय.आर. न्हावकर, एम.के.श्रीवास्तव, भवानी शंकर, ए.एम.खान, धीरजकुमार, अरुणकुमार मिश्रा या सर्व तिकीट निरीक्षक कर्मचाºयांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: TC appreciates for outstanding performance in Bhusawal division