जळगाव- जळगाव शहर मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेवार सुरेश भोळे यांनी ६४ हजार २८७ मतांनी आघाडी घेत प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला. सुरेश भोळे यांना १ लाख १२ हजार २२८ मते मिळाली आहेत.सकाळी ८ वाजेपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली होती. पहिल्या फेरीपासून सुरेश भोळे यांनी आघाडी घेतली होती, ही आघाडी प्रत्येक फेरीमध्ये कायम ठेवून त्यांनी अखेर विजय मिळविला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}