शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाच मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार

By admin | Updated: January 11, 2017 00:49 IST

जळगाव : जिल्ह्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भरारी फाउंडेशन प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करणार आहे.

जळगाव : जिल्ह्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भरारी फाउंडेशन प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. तसेच सामूहिक विवाह सोहळ्य़ात संबंधित मुलींचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही फाउंडेशन करणार आहे. मंगळवारी भरारी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मदत जाहीर केलेल्या दोन आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलींनी ‘लोकमत’च्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील शहर कार्यालयास भेट दिली.  आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी आगामी काळात काय उपक्रम घेतले जातील याची माहिती फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी दिली. सपनाबाई लक्ष्मण पवार रा.तर्डी ता.पारोळा, मुस्कान मुबारक तडवी रा.किनगाव ता.यावल, कल्पना बलदेवसिंग राजपूत रा.चाळीसगाव, अरुणाबाई त्र्यंबक पाटील रा.अमळनेर या मुली व लक्ष्मीबाई लक्ष्मण बंजारा रा.भाटपुरा ता.शिरपूर यांच्या मुलीच्या लग्नासाठी फाउंडेशन 50 हजार रुपये मदत देणार आहे. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी लोकसहभाग वाढल्यास मदतीचे स्वरूप आणखी व्यापक करू, असे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले. या वेळी भरारी फाउंडेशनचे रितेश लिमडा, सागर पगारिया, योगेश सुतार, योगेश हिवळकर, चाणक्य जोशी, विक्रांत चौधरी, गणेश नाईक, मुग्धा कुळकर्णी, नेहा बोरसे, प्रमोद बागडे, अमेय जोशी उपस्थित होते. 82 मुलांना घेतले दत्तकफाउंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 82 मुलांना दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जात आहे. तसेच सावखेडा ता.यावल येथील एका आत्महत्याग्रस्त शेतक:याच्या मुलीचे लग्न यापूर्वीच पार पडले आहे. वसतिगृह व रोजगारासाठी प्रयत्नया मुलामुलींसाठी लोक सहभागातून वसतिगृह उभारण्याचा प्रयत्न असून, संबंधित मुले व मुलींना रोजगारक्षम बनविण्यासाठीही काम केले जाणार आहे, असा मनोदय दीपक परदेशी यांनी व्यक्त केला.