शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

जळगाव : आसोदा येथील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ...

जळगाव : आसोदा येथील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. चेतन दिलीप चौधरी असे मयत तरूणाचे नाव आहे.

चेतन चौधरी हा आसोदा येथे कुटूंबियांसह वास्तव्यास होता. गुरूवारी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटूंबियांना कळताच, त्यांनी लागलीच त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे.

===================

स्वच्छतेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवकॉलनी उड्डाणपुल परिसरातील रस्त्याच्याकडेला कचरा साचला आहे. नुकताच या भागामध्ये बाजारही भरत आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला खराब भाजीपाला सुध्दा फेकला जातो. त्यामुळे या भागात साफसफाई करण्‍यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

==================

फुले मार्केट भागात वाहतुकीची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी सुध्दा फुले मार्केट परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. सोबतच पिंप्राळा रस्त्यावरील भाजीबाजारामुळे या रस्त्यावरी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होण्‍याचा प्रकार नित्याचेच झाले आहे.

====================

दुचाकीची समोरासमोर धडक

जळगाव : जळगाव-पाळधी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दुचाकींची समोरासमोर धडक झाली. खड्डा चुकविण्‍याच्या नादात हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्‍यात यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्‍यात आली आहे.