आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी मंत्रालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 09:11 PM2019-09-18T21:11:37+5:302019-09-18T21:11:42+5:30

चोपडा : मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास विभागाचे सचिव मा.डॉ. राजेश सोंळकी यांना जिल्ह्यासह तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृह ...

Strike in ministry for demands of tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी मंत्रालयात धडक

आदिवासी विद्यार्थ्यांची मागण्यांसाठी मंत्रालयात धडक

Next



चोपडा : मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास विभागाचे सचिव मा.डॉ. राजेश सोंळकी यांना जिल्ह्यासह तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्यांसंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फ जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, प्रा.जेकराम बारेला, प्रा.जेकराम बारेला, प्रा.संजय भादले यांनी १८ रोजी निवेदन दिले.
चोपडा येथे शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी शासकीय जागा त्वरित मिळावी, जिल्ह्यासह तालुका स्तरावर उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींची यादी त्वरित प्रसिद्ध करून प्रवेश द्यावेत, या शैक्षणिक वर्षाचा निर्वाह भत्ता, डी.बी.टी.रक्कम त्वरित द्यावी, २०१८-१९ या वर्षाची शिष्यवृत्ती मिळावी, संयम योजना बंद करून वसतिगृहांची संख्या वाढवावी, यावल प्रकल्प कार्यालयात वसतिगृहाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुभव कर्मचाºयांची नियुक्ती करावी आदी मागण्या निवेदनात मांडल्या आहेत.

Web Title: Strike in ministry for demands of tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.