सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 08:50 PM2020-12-04T20:50:38+5:302020-12-04T20:50:49+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवित्त व लेखा अधिकारी ...

Somnath Gohil accepted the post of Additional Finance and Accounts Officer | सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार

सोमनाथ गोहीलांनी स्वीकारला अतिरिक्त वित्त व लेखा अधिकारी पदाचा कार्यभार

googlenewsNext

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवित्त व लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांनी शुक्रवारी स्वीकारला.

विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारातून कार्यमुक्त करणे बाबत डॉ.विवेक काटदरे यांनी कुलगुरुंकडे विनंती केली होती. ती मान्य करण्यात येऊन उप वित्त व लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांच्‍याकडे ४ डिसेंबर पासून वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. श्री.गोहिल यांनी डॉ.विवेक काटदरे यांच्याकडून वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आज स्वीकारला. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, आणि अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Somnath Gohil accepted the post of Additional Finance and Accounts Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.